विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. विराट कोहलीने ट्विट करून सोमवारी दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली आहे.
विराट कोहलीने ट्विटमध्ये म्हंटले आहे की “आम्हाला दोघांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. अनुष्का आणि आमची मुलगी ठीक आहे, आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला ही गोष्ट अनुभवता आली. आत्ता आम्हाला थोडी प्रायवसी हवी आहे आणि ते तुम्ही समजून घ्याल”
ऑगस्ट महिन्यामध्ये अनुष्का आणि विराट यांनी आपण लवकरच आई बाबा होणार असल्याची गॉड बातमी चाहत्यांना दिली होती. सर्व स्तरांवरून अनुष्का आणि विराट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.