घेणं ना देणं गावभर फिरून येणं यांसारख्या अनेक म्हणींमुळे झी मराठी वरील ‘देवमाणूस’ ह्या मालिकेतील सरू आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. सरू आज्जीमुळे जुन्या म्हणींना पुन्हा वैभव प्राप्त होत आहे.
सरू आज्जीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार ह्या ७० वर्षांच्या आहेत. याआधी त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमद्धेही काम केल आहे. अभिनय क्षेत्रात त्या गेल्या १० वर्षांपासून काम करत आहेत. पण ‘देवमाणूस’ मधील ह्या आज्जीच्या भूमिकेमुळे त्या सध्या खूप चर्चेत आहेत. याआधी त्यांनी मिसेस मुख्यमंत्री, लागीर झालं जी, दुर्वा यांसारख्या मालिका जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या चित्रपटांमद्धे भूमिका साकारल्या आहेत.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रुक्मिणी आज्जी सिंचन विभागात नोकरी करायच्या. त्यावेळी सुट्टीच्या दिवशी त्या कुटुंबियांपासून , पतीपासून लपुनछपुन त्या नाटकात भाग घ्यायच्या. या आज्जींनी ‘दबंग’ चिटपटात सलमान खान सोबतही काम केल आहे. आयुष्यात एकदा तरी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली.
Tags: Devmanus serial fame Rukmini Sutar, Rukmini Sutar, Saru aaji real name in devmanus, saru aaji