टीव्ही अभिनेत्री मानसी नाईकने बॉक्सर परदीप खरेरा सोबत गोंडस पोस्टद्वारे तिच्या नात्याबद्दल ३ फेब्रुवारी २०२० ला घोषणा केली होती.
मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी नाईक तिच्या नृत्य कौशल्यामुळे आणि पडद्यावर दिसणाऱ्या मंत्रमुग्ध तेजसाठी ओळखली जाते. तिने तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे ३ फेब्रुवारी २०२० ला इस्टाग्रामद्वारे एका गोंडस पोस्टसह स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या नात्याची घोषणा केली होती. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत असे शीर्षक दिले की ” यावर्षी मी प्रेम आणि वचनबद्धतेने स्वतःला गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. मला काय सापडले याचा अंदाज लावा. एक मेहनती, एकनिष्ट, निष्टावान आणि वचनबद्ध आत्मा! होय , मी प्रेमात आहे. परदीप खरेरा माझ्या जगात स्वागत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
आत्ता १० नोव्हेंबेर २०२० रोजी मानसी नाईक व परदीप खरेरा यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. हे देखील तिने तिच्या इस्टाग्राम द्वारे सांगितले आहे. परदीप खरेरा आंतरराष्ट्रीय बॉक्सर तसेच मॉडेल आहेत. ते मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट्स २०१८ चे स्पर्धक विजेते देखील आहेत. परदीप खरेरा फॅशन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे. आशा ह्या दोघांनाही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
Tags: Manasi Naik Engagement, Manasi Naik Engaged, Manasi Naik sakharpuda, Manasi Naik and Pardeep Kharera engagement