अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट

अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या वादामध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेविषयी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. याकारणामुळे ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या टीमला सतत धमक्यांचे कॉल येत आहेत. आई माझी काळूबाई मालिकेच्या टीमने आणि अलका कुबल यांनी  उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नुकतेच अलका कुबल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोज पोस्ट केले आहे. या फोटोच्या कॅपेंशन मध्ये त्यांनी लिहल आहेसतत येणारे धमक्यांचे फोन आणि त्यांच्यावर केलेले आरोप याविरोधात आम्ही उदयनराजे यांची भेट घेतली आहे. मी स्वतः मराठा कुटुंबात जन्मले त्यामुळे मी विनंती करते खोट्या आरोपांवर विश्वास ठेऊ नका. कोणत्याही धर्म आणि जाती विरोधात आम्ही नाही.

उदयनराजे भोसले यांनी देखील ट्विट करत म्हंटल आहे की “जेष्ठ अभिनेत्री सौ अलका कुबल यांनी आज भेट घेतली काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली.”

Title: Alka Kubal met Udayanraje Bhosale

Leave a Comment