पतीच्या निधनानंतर मयूरी देशमुख पहिल्यांदाच दिसणार या नवीन भूमिकेत

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख लवकरच हिंदी मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. पती आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर दुःख सावरत मयुरी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा अभिनय साकारताना दिसणार आहे. मयुरीने याआधी अनेक नाटकांमध्ये तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’, ‘लग्न कल्लोळ’ या मराठी चित्रपटांमध्ये तिने अभिनय साकारला होता. ‘तिसरे बादशाह हम’, ‘डिअर आजो’, ‘जून जुलै’ या नाटकांमध्ये तिने काम केले आहे. इमली हि तिची पहिलीच हिंदी मालिका.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री मयुरी देशमुख स्टार प्लस वरील ‘इमली’ या नव्या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनय साकारणार आहे. या मालिकेत ती अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीरसोबत अभिनय साकारताना दिसणार  आहे. नुकताच मयुरीने तिच्या सोसिअल मेडिया अकाउंटवरून इमली या मालिकेचा प्रोमो शेयर केला आहे. या पोस्ट मध्ये तिने लिहलं आहे, ” मी हळूहळू दु:खातून सावरत आहे. तुम्ही माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे आम्हाला बळ मिळालं. तुम्ही दिलेल्या प्रेमातून मला नवं करण्याची ऊर्जा मिळते. पुन्हा एकदा तुमच्या सोबतीची गरज आहे. मी नवीन सुरूवात करीत आहे. ”   

Title: Mayuri Deshmukh New Serial Imali on star pravah

Leave a Comment