अभिनेता सुयश टिळक याला करोनाची लागण

झी मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजेच सुयश टिळक याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह आला होता. अभिनेता सुयश टिळक याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता. त्यामुळे सुयश मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता. सुयशने कोरानावर यशस्वीरीत्या मात केली असून तो आता कोरोनातून पूर्णपणे बारा झाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुयशने त्याच्या सोसिअल मेडिया अकाउंटवर एक पोस्ट शेयर करून माहिती दिली आहे. त्यात त्याने असे लिहले आहे कि, “मी आता व्यवस्थित आहे. पण गेल्या महिन्यात मला कोरोनाची लागण झाल्याच समोर आला होत. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता लक्षणे दिसत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २० दिवस उपचार घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मी आता बरा झालेलो आहे व काम पुन्हा सुरु केले आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वादांसाठी मनापासून आभारी.”

दिवाळी लवकरच येत आहे तर कृपया काळजी घ्या. रस्त्यावर थुंकू नका त्याने हा विषाणू पसरू शकतो. ताप, घास दुसखाने, वास न येणे, चव न कळने, अंगदुखी, असाधारण थकवा असं काही लक्षण दिसलं तर न लपवता डॉक्टरांचा सल्ला घ्या व चाचणी करून घ्या. तुम्हाला काही होत नसेल तरी तुम्ही विषाणू पसरवू शकता. काळजी घ्या. असा मेसेज देखील त्याने लोकांना दिला आहे.

Title: Suyash Tilak corona positive

Leave a Comment