प्राजक्ता गायकवाडच्या ठिकाणी अभिनेत्री वीणा जगताप आर्याची भूमिका साकारणार, वीणाची पहिली प्रतिक्रिया पहा

सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळूबाई मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिची एक्जिट झाली आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी दिलेल्या interview मध्ये प्राजक्ता खूपच unprofessional असल्याचं सांगितलं आहे. अलका कुबल यांनी सांगितले आहे की प्राजक्ता नेहमी सेट वर उशिरा यायची, ज्येष्ठ कलाकारांना ताटकळत ठेवायची. शरद पोंक्षे यांनी देखील प्राजक्ता बद्दल तक्रार करून तिला मालिकेतून काढण्यासाठी अलका कुबल यांना विचारलं होत असे अलका कुबल यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्राजक्ताने देखील आपली बाजू मांडत आपण सेट वरच राहत होतो त्यामुळे उशीर होण्याचा प्रश्नच नाही असे म्हणाली आणि विवेक सांगळेच्या प्रकरणावर प्राजक्ताने सांगितले की विवेकने सेटवरील करोना पेशंटला हॉस्पिटल मध्ये नेण्यात मदत केली होती आणि त्याच्यासोबत मला देखील बोलावण्यात आलं. विवेक करोना पेशंट च्या संपर्कात आल्याने मी त्याच्यासोबत जायला नकार दिला तेव्हा मला त्याने शिवीगाळ केली असे प्राजक्ताचे म्हणणे आहे.

आई माझी काळूबाई मालिकेत प्राजक्ता गायकवाड आर्या ची प्रमुख भूमिका साकारत होती. आता या मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप आर्या ची भूमिका साकारणार आहे. वीणा जगताप ने तिला मिळालेल्या रोलवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे की “आर्या ची भूमिका साकारायला मी खूप excited आहे. मला आई माझी काळूबाई मालिकेच्या टीमचा फोन आला आणि त्यांनी मला अलका ताई सोबत सातारला यायला सांगितले आहे. मी अलका ताईंचे काम लहानपणापासून पाहिले आहे. त्यांचे चित्रपट पाहत पाहत मी लहाणाची मोठी झाली आहे आणि आज मला त्यांच्यासोबत काम करायची संधि मिळत आहे. ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे.”

Tags: veena jagtap replaced prajakta gaikwad in aai mazi kalubai serial

Leave a Comment