अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आई माझी काळूबाई मालिका सोडली

सोनीमराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून आर्य हि प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची एक्सिट झाली आहे. यामागचं कारण असं कि निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेला वाद. निर्मिती संस्था यांनी प्राजक्ता बद्दल बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. यावर मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल या म्हणाल्या, प्राजक्ताला मालिकेचं स्क्रिप्ट १५ दिवस आधीच हवं. मी १ दिवसच शूटिंग करेल, मला परीक्षेसाठी सुट्टी हवी अश्या प्रकारच्या प्राजक्ताच्या तक्रारी होत्या. बरेचदा ती शूटिंग साठी उशिरा पोहचायची. तिच्यासाठी सिनियर कलाकार सेटवर ताटकळत बसायचे. लॉकडाउन नंतरच्या काळात ती सतत परीक्षांची कारण द्यायची. तिच्या नक्की कोणत्या परीक्षा असायच्या हि विचार करण्याची गोष्ट आहे. या सर्वांचा खूप मनस्ताप झाला. तिच्या अश्या वागण्यामुळे तिला मालिकेतून काढण्यात आले. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यासगळ्यावर अभिनेत्री प्राजक्ताच असं म्हणणं आहे, मालिकेचं शूटिंग साताऱ्याला असतं. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची तक्रार कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसंच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितलं होतं. पण, ‘आपण चित्रीकरण करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही’ असं मला सांगण्यात आलं. मी परीक्षा देऊ शकले नाही.  ‘पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी केली नसेल, तर त्यांच्याबरोबर प्रवास कसा करायचा, एवढाच माझा मुद्दा होता. त्यासाठी मला शिवीगाळ केली गेली. मला हे अत्यंत चुकीचं वाटलं. तरीही मी दीड महिना शूटिंग केलं. सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर, मालिका चांगली असूनही नाइलाजास्तव ३१ ऑक्टोबरपर्यंतच काम करेन, असं निर्माते आणि वाहिनीला मी सांगितलं.’ या सगळ्या वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं सांगून मी मालिका सोडली.   

आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या ऐवजी अभिनेत्री विना जगताप दिसणार आहे. विना जगताप बिगबॉस मराठी सीजन २ ची स्पर्धक होती. तसेच तिने कॉलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.  

Tags: Prajakta Gaikwad exit from aai mazi kalubai serial, prajakta gaikwad controversy, prajakta gaikwad and alka kubal controversy

Leave a Comment