बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेचा केला अपमान

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या चर्चेत आहे तो त्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे. जान कुमार सानू सध्या बिग बॉस सिजन १४ चा स्पर्धक आहे. जान कुमार सानूने बिग बॉसच्या घरात “कोणीही माझ्यासोबत मराठीमध्ये बोलू नका, मराठी भाषा ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असे तो बोलला होता. बिग बॉस च्या घरात अभिनेत्री निकी तंबोली जान कुमार सानू सोबत हिंदी ऐवजी मराठी मध्ये बोलत होती. त्यावेळी जान कुमार सानू तिला माझ्याशी मराठी बोलू नको, मला मराठी भाषा आवडत नाही, असे तो बोलला होता. त्याच्या या वादग्रस्त वक्त्यावामुळे मराठी भाषिक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.    

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्याच्या या वक्तव्यावर महेश टिळेकर यांनी सोसिअल मीडियाद्वारे टीका केली आहे. त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? गायक कुमार सानू देखील मुंबईमध्येच राहतात, मराठी लोकांनी त्यांची गाणी ऐकली आहेत त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाट आहे. आणि त्यांचा हा दिवटा मुलगा जान कुमार सानू बिग बॉस मधील त्याच्याशी मराठीत बोणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको असं सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग असेल तर याने महाराष्ट्रात तरी का राहावे” असे पोस्ट मध्ये टाकून महेश टिळेकरने जान कुमार सानूच्या वक्त्यावर टीका केली आहे. त्यांनी हि पोस्ट सध्या सोसिअल मीडियावर वायरल होत आहे.  

Tags: Jaan Kumar Sanu Marathi Controversy, jaam kumar sanu controversy, jaan kumar sanu on marathi language, jaan kumar asanu disrespect marathi language

Leave a Comment