ज्येष्ठ मराठी अभिनेत्री गीतांजली कांबळी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. २०१२ पासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज पहाटे मुंबईमधील सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या आजारपणात त्यांचे पती लवराज कांबळी त्यांच्यासोबत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गीतांजली या एक मराठी अभिनेत्री आणि नाट्यअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. केदार जाधव दिगदर्शित ‘सही रे सही’ या नाटकातील त्यांनी साकारलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्याचबरोबर ‘वस्त्रहरण’ या नाटकातील त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी ५०हून आदिक नाटकांमध्ये अभिनय साकारला होता.  झी मराठी वाहिनीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये त्यांनी साकारलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. 

गीतांजली यांनी अनेक मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. गीतांजली या मूळच्या कोकणातील मालवणच्या होत्या. गीतांजली यांनी बकुळा नामदेव घोटाळे, गालगले निघाले, टाटा बिर्ला यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Tags: Gitanjali Kambli, Gitanjali Kambli News

Leave a Comment