नंदिता वहिनीची पुन्हा एकदा होणार मालिकेत एंट्री

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सर्वत्र होती. पण मुळात हि एक अफवा असून तुझ्यात जीव रंगला हि मालिका बंद होणार नसून या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील खलनायिकेची भूमिका म्हणजेच नंदिता हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. आता हे पात्र नक्की कोणती अभिनेत्री साकारणार याची सर्वाना उत्सुकता आहेच. याआधी नंदिता हे पात्र अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने साकारले होते. मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका जरी साकारली असली तरी तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल.

परंतु नंदिताला तुरुंगात टाकल्यामुळे तिचे हे पात्र संपुष्टात आले. मालिकेची trp रेटिंग घसरल्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल. या मध्ये आपल्याला नंदिता पुन्हा एकदा गायकवाडांच्या घरात एंट्री करताना दिसणार आहे. आता मालिकेतील नंदिताची भूमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.      

तर मित्रांनो तुम्हाला मालिकेत पुन्हा एकदा नंदिता वाहिनी पाहायला आवडेल का ते कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Dhanashri Kadgaonkar entry in Tuzhyat Jeev Rangala, Nandita Comeback in tuzhyat jeev rangala

Leave a Comment