मराठी अभिनेत्रीचा नवरात्री निमित्त पिवळा पोशाख

नवरात्रोत्सवात रंगांना फार महत्व दिले जाते. नवरात्रोत्सवाचा आजचा ६वा दिवस. आजचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. आज देवीची सहावी माळ असल्याने देवी मातेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन तिची कातयानी देवीच्या स्वरुपाता पूजा बांधतात. कातयानी देवी वाईट शक्तींचा विनाश करते म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिची पूजा करतात आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरण्याची पद्धत आहे. पिवळा हा रंग आनंदाचे आणि आशेचे प्रतिक मानला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दरवर्षी नवरात्री उत्सव सर्वजण एकत्र येऊन साजरा केला जातो मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे आपण एकत्र जरी येऊ शकत नसतो तरी सोसिअल मीडिया च्या माध्यमातून आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. अश्याच काही मराठी कलाविश्वातील अभिनेत्रीनंने पिवळ्या रंगाची साडी नेसून नवरात्र उत्सव साजरा केला आहे आणि सोसिअल मीडियाच्या माध्यमांतून सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Comment