कारभारी लयभारी मालिकेतील अभिनेत्री कोण आहे?

सध्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेचे प्रोमोची सगळीकडे चर्चा आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘कारभारी लयभारी’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे पहिले दोन प्रोमो सोसिअल मीडियावर खूप वायरल झाले आहेत. या प्रोमोमध्ये एक राजकीय नेता दाखवला आहे. हि मालिका राजकारणावर आधारित असून या मालिकेत आपल्याला लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. कारभारी लयभारी या मालिकेत अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तिने कलर्स  मराठी वाहिनीवरील ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारली होती. आता ती कारभारी लयभारी मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अनुष्का सरकटे हि मूळची औरंगाबादची असून तिचा जन्म ७ नोव्हेंबर १९९४ रोजी औरंगाबाद मध्येच झाला. अनुष्काला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड आहे. 

कारभारी लयभारी मालिकेत अभिनेता निखिल चव्हाण आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील फौजी विक्रम म्हणजेच विक्या हि भूमिका साकारली होती. त्याचबरोबर स्त्रील्लिंग पुल्लिंग या वेब सिरीज मध्ये देखील त्याने अभिनय साकारला आहे.  अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल आता कारभारी लयभारी या मालिकेत एका राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

तर मित्रांनो झी मराठी वरील ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात की नाही ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Anushka Sarkate, Karbhari Laybhari actress real name

Leave a Comment