लाडाची मी लेक ग मालिकेतील कलाकारांचे रीयल लाइफ पार्टनर

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेने अगदी काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर ‘कस्तुरी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेता आरोह वेलणकर डॉक्टर सौरभ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. आज आपण या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांची माहिती पाहणार आहोत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • मिताली मायेकर & सिद्धार्थ चांदेकर
Mitali Mayekar & Siddharth Chandekar

‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेत ‘कस्तुरी’ ही प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर साकारत आहे. मितालीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार हा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे २ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. २४ जानेवारी २०१९ रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला असून लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत.

  • आरोह वेलणकर & अंकिता सिंघवी
Aroh Welankar & Ankita Singhavi

या मालिकेतील डॉक्टर सौरभ ही प्रमुख भूमिका अभिनेता आरोह वेलणकर साकारत आहे. आरोहने रेगे, घंटा या मराठी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच तो बिग बॉस मराठी पर्व २ मधील टॉप पाच पैकी एक स्पर्धक आहे. आरोहचा प्रेम विवाह झाला असून त्याच्या रिअल लाईफ पार्टनरचे नाव अंकिता शिंघवी असे आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी यांचा विवाह सोहळा पार पडला.       

  • स्मिता तांबे & विरेन्द्र
Smita Tambe & Virendra Dwivedi

‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेमध्ये सौरभच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच स्मिता तांबेच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचे नाव वीरेंद्र द्विदेवी असे आहे. वीरेंद्र हा एक नाट्यकलाकार आहे.  १८ जानेवारी २०१९ रोजी अभिनेत्री स्मिता तांबे आणि नाट्यकलाकार वीरेंद्र द्विदेवी सोबत लग्न बंधनात अडकली.

तर मित्रांनो तुम्हाला यातील कोणती जोडी खूप जास्त आवडली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Real life partner of ladachi mi lek g actors, smita tambe husband, mitali mayekar husband, aroh welankar wife

Leave a Comment