ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाले. त्या मराठी अभिनेत्री, नाट्यअभिनेत्री आणि मराठी गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले ४ दिवस उपचार सुरु होते. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशालता यांच्या दुःखद निधनामुळे मराठी चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.
आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवरील आणखी २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामालिकेच्या शूटिंग साठी मुंबईहून डान्स ग्रुप बोलविण्यात आला होता त्यांच्या मार्फत कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.
आशालता जवळपास ४० हुन अधिक वर्षासाठी मराठी सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. अनेक मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. आशालता या मूळच्या गोवाच्या होत्या. त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी २०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केला आहे.
‘गुंतता हृद्य हे,’ ‘चिन्ना आणि महानंदा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘स्वामी’, ‘मदनाची मंजिरी’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आशालता यांनी ‘उंबरठा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘सूत्रधार’, ‘वाहिनीची माया’, माहेराशी साडी’, ‘एका पेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’,यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘आपने पराये’, ‘अंकुश’, ‘नामक हलाल’, ‘कुली’, ‘जंजीर’, ‘आज कि आवाज’, ‘वो सात दिन’, ‘घायल’, ‘शौकीन’, ‘ये तो कमल हो गया’, ‘मागाल पांडे’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
Tags : ashalata wabgaonkar news