Smita Tambe Biography, Wikipedia, Birthday, Age, Husband, Family, Qualification, Movies, Serials
स्मिता तांबे हि मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. स्मिताचा जन्म ११ मे १९८३ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये झाला. तिचे लहानपण पुण्यात गेले. स्मिताचे शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कुल, निगडी येथे झाले. १८ जानेवारी २०१९ रोजी अभिनेत्री स्मिता तांबे नाट्यकलाकार वीरेंद्र द्विदेवी सोबत लग्न बंधनात अडकली.
स्मिताने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय साकारून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नाती गोती, जोगवा, इट्स ब्रेकिंग न्यूस, देऊळ, तुकाराम, ७२ मैल एक प्रवास, कॅण्डल मार्च, महागुरू, लाठी, पारतु, बीओस्कोप, गणवेश, सावट यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर सिंघम रिटर्न्स, उर्मिका, रुख, नूर, डबल गेम, पंगा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. स्मिता ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभागी झाली होती.
अभिनेत्री स्मिता तांबे हिचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव धीरेंद्र द्विवेदी असे आहे. धीरेंद्र हे अमराठी आहेत. स्मिता आपल्या पतीसोबत नेहमी सोशल मीडिया वर फोटो शेअर करत असते. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेमध्ये अभिनेत्री स्मिता तांबे सौरभच्या आई ची भूमिका साकारत आहे.
Tags: Smita Tambe Biography, Smita Tambe Wikipedia, smita tambe husband, smita tambe love story, smita tambe in ladachi mi lek ga, smita tambe birthday, smita tambe age, smita tambe family, smita tambe wedding, smita tambe marriage, smita tambe imges