झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम भूमिका साकारल्या आणि रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केल आहे. याच मालिकेतील अशाच एका हुरहुन्नरी अभिनेत्याचे दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेते प्रशांत लोखंडे यांचे 14 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आपण पाहिले आहे की कोंडाजी बाबा यांना मुरुड जंजीरा किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी मदत अब्दुल्ला दळवी यांनी केली होती. अब्दुला दळवी हे पात्र साकारणारे अभिनेते प्रशांत लोखंडे यांनी 14 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला आहे. इतक्या कमी वयात निधन झाल्याने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
अब्दुल्ला दळवी यांच्या पात्राला प्रशांत लोखंडे यांनी उत्तम न्याय दिला होता. त्यांचा “बाद मे कटकट नको” हा डायलॉग प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. या उत्तम कलाकाराच्या अचानक जाण्याने मित्र परिवार आणि अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
या शिवाय प्रशांत लोखंडे यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत बाजीराव घोरपडे ही भूमिका देखील उत्तम साकारली होती. दोन्ही मालिकेच्या टीमकडून प्रशांत लोखंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Tags: Swarajya Rakshak Sambhaji actors prashant lokhande news