सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मिताली मायेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा साखरपुडा गेल्या वर्षी जानेवारी मध्ये पार पडला आणि त्यांचे लग्न जून 2020 मध्ये होणार होते. परंतु करोनामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढच्या वर्षी ढकलावी लागत आहे.
मितालीने एक मुलाखतीत सांगितले आहे की “सिद्धार्थ आणि मला आमच लग्न मोठ्या थाटामतात करायच आहे. आमचे सर्व मित्र आणि नातेवाईक यांनी देखील यांच्या लग्नाला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि आत्ता ते शक्य नाही. म्हणून आम्ही आमच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला 2020 मध्ये अजिबात लग्न करायच नाही. पुढच्या वर्षी सर्व परिस्थिति ठीक झाल्यानंतरच आम्ही लग्न करू.”
“आत्ता आम्ही कपल प्रमाणे एकत्र राहत आहोत. आम्ही आमच्या घरातील सर्व निर्णय दोघे घेत असतो. एवढंच नाही तर सिद्धार्थ माझ्यासाठी रोज सकाळी जेवण बनवतो आणि मला शूट वर जाताना टिफिन देखील न विसरता देतो.”
मिताली मयेकर आत्ता लवकरच आपल्याला झी मराठी वहिणीवरील लाडाची मी लेक गं या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे आणि सिद्धार्थ चांदेकर याने गुलाब जाम, मिस्स यू मिस्टर, झेंडा, वजनदार, क्लासमेट यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत काम केले आहे.
तर मित्रांनो मिताली आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.
Title: Mitali Mayekar and Siddharth Chandekar postpone their Marriage