गौरी आणि जयदीप यांच्या रीयल लाइफ फॅमिली पाहा

Real Life Family of Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Girija Prabhu and Mandar Jadhav

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या मालिकेने पहिल्याच आठवड्यात trp मध्ये पाचवा क्रमांक मिळवला होता. या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू गौरीची तर अभिनेता मंदार जाधव जयदीपची प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर आज आपण या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची खऱ्या आयुष्यातील फॅमिली मध्ये कोण कोण आहे ते पाहणार आहोत.

अभिनेता मंदार जाधव याने मराठी तसेच अनेक हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मंदारचे लग्न 2016 मध्ये मितिका शर्मा हिच्याशी झाले आहे. त्यांच्या लग्नाला आत्ता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. मंदार आणि मितिका यांना 2 लहान मूल देखील आहेत. मोठ्या मुलाचे नाव रीदान असून लहान मुलाचे नाव रेहान असे आहे. मंदारचे आई आणि वडील देखील मंदार सोबतच रहात आहेत. मंदारच्या वडिलांचे नाव सुभाष जाधव असून आईचे नाव रिणा जाधव आहे. मंदारचे वडील देखील एक अभिनेते होते. त्यांनी 80 च्या आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. मंदारचा एक लहान भाऊ देखील आहे. त्याचे नाव मेघन जाधव असून तो सुद्धा अभिनय क्षेत्रातच अॅक्टिव आहे. त्याने खूप साऱ्या हिन्दी मालिकांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री गिरिजा प्रभू पहिल्यांदाच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून प्रमुख भूमिका साकारत आहे. यापूर्वी देखील खूप साऱ्या मराठी मालिका आणि चित्रपटात छोटे मोठे रोल केले आहेत. ती एक उत्तम डान्सर देखील आहे. गिरिजाच्या घरात तिचे आई, बाबा आणि आणि तिचा मोठा भाऊ आहे. गिरिजाच्या आईचे नाव तनुजा प्रभू असून त्या हाऊसवाइफ आहेत तर तिच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू असून ते रिटायर झाले आहेत. त्याशिवाय गिरिजा ला एक भाऊ देखील आहे त्याचे नाव गौरव प्रभू असे आहे.

तर मित्रांनो गौरी आणि जयदीप यांची फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.instagram.com/p/CDI_NL-Jg-8/
https://www.instagram.com/p/BY8i5ElA8lI/

Tags: Mandar Jadhav Real life family, mandar jadhav wife, mandar jadhav kids, mandar jadhav parents, mandar jadhav brother, girija prabhu real life family, girija prabhu mother, girija prabhu father, girija prabhu brother, girija prabhu boyfriend

Leave a Comment