Pooja Purandare Biography, Wiki, Birth Day, Age, Husband, Boyfriend, Family, Parents, Qualification, Education, Serials, Hot, Movies

Pooja Purandare Biography, Wiki, Birth Day, Age, Husband, Boyfriend, Family, Parents, Qualification, Education, Serials, Hot, Movies

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता समीर परांजपे अभिची आणि अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाची प्रमुख भूमिका साकारत आहेत. लतिकाच्या घरातील सर्वजण लतिकाचे लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु ती शरीराने जाड असल्यामुळे तिला लग्नासाठी नकार मिळत आहेत. त्यातच या मालिकेत कामिनीची एंट्री झाली आहे. ती अभिवर खूप प्रेम करत आहे. कामिनी फिट अँड खूपच सुंदर दिसत आहे. कामिनी हे पात्र अभिनेत्री पूजा पुरंदरे साकारत आहे.   तर आज आपण या मालिकेतील कामिनी म्हणजेच अभिनेत्री पूजा पुरंदरे विषयी जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री पूजा पुरंदरे हिचा जन्म 23 डिसेंबर रोजी पुण्यात झाला आहे. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील P. jog highschool मधून पूर्ण केले आहे. नंतर तिने सिंहगड कॉलेज मधून B.Com ची पदवी प्राप्त केली आहे. पूजाच्या वडिलांचे नाव अजित पुरंदरे असून आईचे नाव नंदिनी पुरंदरे असे आहे.

अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली आहे. नाटक करत असताना तिला टीव्ही वरील जाहिरातीसाठी विचारण्यात आले. ती जाहिरात केल्यानंतर आपण अभिनय क्षेत्रातच आपल करियर करायच असं तिने ठरवलं.

अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी सुंदर माझ घर या मालिकेत गायत्रीची नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याशिवाय किती सांगायचे मला या मालिकेत उर्मीची आणि नकुशी या मालिकेत मृण्मयीची भूमिका साकारली आहे.

आता ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत कामिनीची नकारात्मक भूमिका साकारत आहे. कामिनीला अभि आवडत असल्यामुळे ती त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत आहे आणि तिला अभिशी लग्न देखील करायच आहे. कामिनीची बहीण अभिची वाहिनी आहे आणि तीच कामिनी चे लग्न अभिशी व्हाव म्हणून कामिनीला अभिला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला सांगत आहे. परंतु आपल्याला पुढे जाऊन या मालिकेत कामिनीच्या मनासारखे न झाल्यामुळे ती काय काय करेल हे देखील पाहायला मिळेल. त्याशिवाय या मालिकेत आपल्याला लव ट्रायअॅंगल देखील पाहायला मिळणार आहे.

तर मित्रांनो मालिकेतील कामिनीची भूमिका तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.instagram.com/p/B-jLKzZplV7/

Tags: Pooja Purandare, Pooja Purandare Biography, Pooja Purandare Lifestyle, Pooja Purandare WIkipedia, Pooja Purandare Birth Day, Pooja Purandare Age, Pooja Purandare Family, Pooja Purandare Parents, Pooja Purandare Husband, Pooja Purandare Qualification, Pooja Purandare Serial, Pooja Purandare In sundara manamdhye bharali

1 thought on “Pooja Purandare Biography, Wiki, Birth Day, Age, Husband, Boyfriend, Family, Parents, Qualification, Education, Serials, Hot, Movies”

Leave a Comment