सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे.
सुबोध भावे यांनी स्वत फेसबूक वर पोस्ट करत आपल्याला करोना झाल्याचे स्पष्ट केले आहे. सुबोध भावे यांच्यासोबतच त्यांची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांना देखील करोना झाला आहे. सुबोध भावे यांनी फेसबूक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की “मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया”
सुबोध भावे यांनी २-३ दिवसांपूर्वीच त्याच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करतानाचा विडियो पोस्ट करत सर्वाना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. परंतु आत्ता स्वत सुबोध भावे यांना करोनाची लागण झाली असून ते त्यांच्या घरात quarantine आहेत. सुबोध भावे यांचे सर्व चाहते पोस्ट खाली कमेन्ट करत तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल अश्या कमेन्ट करत आहेत. तर मित्रांनो यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.
Tags: Subodh Bhave corona positive, subodh bhave corona news, subodh bhave family corona positive