सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहा.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे तर आज आपण या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांबद्दल जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१. मीनाक्षी राठोड

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री मीनाक्षी राठोड देविका ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने कलर्स मराठी वरील बाळू मामाच्या नावानं चांगभल या मालिकेत पंचबाईंची भूमिका साकारली होती. देविका देखील गौरीला त्रास देण्यासाठी शालिनी ला नेहमी मदत करत असते.

अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिचे लग्न अभिनेता कैलाश वाघमारे याच्यासोबत झाले आहे. कैलाश देखील एक अभिनेता असून त्याने तानाजी या बॉलीवुड चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने अनेक मराठी चित्रपटांत देखील काम केले आहे.

२. माधवी नेमकर

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी नेमकर हिने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री माधवी नेमकर शालिनीची भूमिका साकारत आहे. शालिनी हे पात्र या मालिकेत नकारात्मक दाखवयाण्यात आले आहे. शालिनी नेहमी गौरील त्रास देण्याचे काम करत असते आणि तिच्या विरोधात नेहमी वेगवेगळे कट कारस्थान रचत असते.

अभिनेत्री माधवी नेमकर हिचे लग्न २०१० साली विक्रम कुलकर्णी यांच्याशी झाले असून आत्ता त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव रुबेण आहे. माधवी नेमकर नेहमी आपल्या मुलाचे विडियो सोशल मीडिया वर नेहमी शेयर करत असते.

३. वर्षा उसगावकर

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी खूप साऱ्या मराठी आणि बॉलीवुड चित्रपटांत काम केले आहे. तब्बल १० वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच लग्न २००० साली अजय शर्मा यांच्याशी झाले आहे. अजय शर्मा हे  देखील कला विश्वाशीच निगडीत असून ते दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करत आहेत.

४. मंदार जाधव

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीपची महत्वपूर्ण भूमिका अभिनेता मंदार जाधव साकारत आहे. यापूर्वी मंदारने हिन्दी तसेच मराठी मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी वरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत मंदारने गुरुदेव दत्त यांची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आत्ता तो स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप ची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

मंदार जाधव याचे लग्न २०१६ मध्ये मितिका शर्मा हिच्याशी झाले आहे. मितिका ही मराठी नसून हिन्दी भाषिक आहे. त्यांच्या लग्नाला आत्ता ४ वर्ष पूर्ण झाले असून मंदार आणि मितिका यांना २ लहान मुलं देखील आहेत.

तर यातील कोणाची जोडी तुम्हाला खूप जास्त आवडली ते कमेन्ट करून नक्की सांगा.

tags: sukh khanje nakki kay asta cast, sukh mhanje nakki kay asta cast real life partner, sukh mhanje nakki kay asta cast real life husband wife

Leave a Comment