सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून गोड बातमी दिली आहे. आपण लवकरच आई बाबा होणार असल्याचे विराट आणि अनुष्काने जाहीर केले आहे. ही गोड बातमी ऐकून चाहते खूपच खुश झाले आहे. दिग्गज कलाकार आणि क्रिकेट पटू देखील विराट आणि अनुष्का यांना शुभेच्छा देत आहेत.
विराट कोहली सध्या आयपीएल खेळण्यासाठी दुबईला रवाना झाला आहे, आयपीएल २०२० या वेळेस दुबई मध्ये होणार असून सर्व टीम दुबई ला पोहोचल्या आहेत. १९ सेप्टेंबर पासून आयपीएल २०२० सुरू होणार आहे.
अनुष्का शर्मा आपल्याला शेवट झीरो या चित्रपटात दिसली. या चित्रपटानंतर तिने ब्रेक घेतला. या चित्रपटात तिने शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत काम केले आहे.
आज दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी कोहलीने आपल्या सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करत म्हंटल आहे की आम्ही दोनचे तीन झालोय. जानेवारी २०२१ मध्ये घरात पाळणा हलणार असल्याची माहिती देखील त्याने ट्वीटर द्वारे दिली आहे. ट्विट केलेल्या फोटो मध्ये अनुष्का बेबी बंप दाखवताना दिसत आहे.
विराट आणि अनुष्का यांनी इटली मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत २०१७ मध्ये लग्न गाठ बांधली होती.
Tags: Virat Kohali and Anushka Sharma announce pregnancy, virat kohli, anushka sharma