लागीर झालं जी मालिकेतील हा कलाकार नुकताच विवाह बंधनात अडकला!

लागीर झालं जी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या मालिकेला विसरले नाहीत. या मालिकेतील अजिंक्य, शीतल, भैय्यासाहेब, राहुल्या, जयडी यांच्यामुळे मालिका पाहायला खूप आवडायची. परंतु मित्रांनो याच्या व्यतिरिक्त या मालिकेत काही असे कलाकार होते जे आपल्याला स्क्रीन वर खूप कमी वेळ दिसायचे. परंतु त्यांची भूमिका ते खूप चोखपणे पार पाडायचे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लागीर झालं जी मालिकेत असाच एक अभिनेता होता. त्याचे नाव किरण दळवी. किरणने मालिकेत गोट्याची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत आपल्याला गोट्याची भूमिका खूप वेळेस पाहायला मिळाली. गोट्या हे मालिकेतील एक कॉमेडी पात्र होतं. किरण हा एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहे.

लागीर झालं जी मालिकेत गोट्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण दळवी खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात अडकला आहे. किरणणे आपल्या लग्नाचा फोटो सोशल मीडिया वर अपलोड केला आहे. त्याच्या पत्नीचे नाव मोनाली गायकवाड असून त्याची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. लागीर झालं जी मालिकेतील कलाकारांनी देखील किरण आणि मोनाली यांच्या लग्नाच्या पोस्ट खाली दोघांचे अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता किरण दळवी आणि मोनाली गायकवाड याच्या भावी आयुष्यासाठी AtoZ Marathi चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

Kiran Dalavi Marriage Photo

tags: kiran dalavi marriage, kiran dalavi wedding, lagira zal ji fame kiran dalavi marriage

Leave a Comment