चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोच्या माध्यमातून भाऊ कदम घराघरात पोहोचले. आज त्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. भाऊ कदम यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. आज लोकांनी त्यांचा अभिनय पाहता त्यांना अगदी आपल्या डोक्यावर घेतलं आहे. भाऊ कदम आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर नेहमी आपल्या फॅमिली सोबत फोटो पोस्ट करत असतात. तर आज आपण त्यांच्या फॅमिली मद्ये कोण कोण आहे ते पाहणार आहोत.
भाऊ कदम यांनी खूप लोकप्रियता मिळवली असली तरी त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. ते स्वतःला एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे मानतात. घरचे देखील त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ते घरातील कोणालाही कधी चुकूनही दुखावत नाही. त्यांनी एका मुलाची, एका भावाची, एका नवऱ्याची, एका वडिलांची संपूर्ण कर्तव्ये निभावली आहेत. भाऊ कदम यांच्या फॅमिली मध्ये त्यांची आई, भाऊ, बायको आणि त्यांची मुलं आहेत.
भाऊ कदम यांचा भाऊ सेम टू सेम भाऊंसारखा दिसतो. भाऊ कदम यांनी आपल्या भावासोबत खूप सारे फोटो आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट शेअर केले आहेत. भाऊ कदम यांच्या मातोश्री भाऊंवर खूप प्रेम करतात. आज त्यांचं वय झालं आहे. भाऊ कदम यांचा संपूर्ण खडतर जीवनप्रवास त्यांनी अनुभवला आहे. त्यामुळे भाऊ हा माझा मुलगा आहे असं त्या गर्वाने सांगतात.
भाऊ कदम यांचं लग्न ममता यांच्याशी झालं. त्यांनी देखील भाऊंना कठीण काळात खूप साथ दिली. आत्ता त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. भाऊ कदम यांच्या मोठ्या मुलीचे नाव मृण्मयी असून १ मुलगा आणि २ मुली लहान आहेत. भाऊ कदम यांची मुलगी दहावीत पास झाल्यानंतर भाऊ कदम खूप खुश झाले होते. त्यांनी सर्वत्र पेढे वाटून आपल्या मुलीला शाबासकी दिली होती. भाऊ कदम यांची मुलगी म्हणते कि आमच्या बाबांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांनी आमच्याकडून कधीच जास्तीची अपेक्षा ठेवली नाही. आम्ही जे काही करेल त्यात ते खुश असतात. मला कधी कमी मार्क्स मिळाले तर ते मला समजून घेतात. बाबा कधी स्वतः नवीन गोष्टी वापरत नाही. पण आम्हाला मात्र काहीच कमी पडू देत नाही. आम्हाला जे पाहिजे आहे ती गोष्ट माझे बाबा मला आणून देतात.
तर मित्रानो भाऊ कदम यांची फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.
Bhau Kadam Family
Tags: Bhau Kadam Family, Bhau Kadam Daughter, Bhau Kadam Kids, Bhau Kadam Wife, Bhau Kadam Marriage, Bhau Kadam Wedding, Bhau Kadam Brother, Bhau Kadam Mother, Bhau Kadam Biography, Chala Hawa Yeu dya