Ketaki Chitale New Controversy
अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे ते तिने केलेल्या एका पोस्ट मुले. केतकी विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या कारणास्तव भांडूप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
१ मार्च २०२० रोजी रात्री केतकी चितळे ने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहले आहे, “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.”
‘ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की ‘मुसलमान, ख्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू’ असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय.’ जागे व्हा जरा. मी सर्वप्रथम एक भारतीय आहे. मी हिंदु विचारसरणीचे पालन करते. मला कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा द्वेष नक्कीच जास्त आहे. अशी पोस्ट केतकीने फेसबुकवर टाकली आहे.
तिच्या या पोस्ट वर काही आंबेडकर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन अभिनेत्री केतकीला ही ट्रोल केले आहे. तिच्या या पोस्टचा जाहीर निषेध केला आहे. तसेच केतकीवर अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Tags: Ketaki Chitale Latest Controversy, Ketaki Chitale Controversy, Ketaki Chitale, Ketaki Chitale Police Case, केतकी चितळे वाद