भाऊ कदम यांचा ५० वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा!

Bhau Kadam 50th Birthday Celebration

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारे काॅमेडी किंग कलाकार भालचंद्र कदम म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाऊ कदम यांचा आज ५०वा वाढदिवस.

मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजेच भाऊ कदम. प्रचंड यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदम यांच्या स्वभावातील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधं राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम रसिक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत.

Bhau Kadam Birthday Celebration with family

भाऊंनी आजवर अनेक काॅमेडी शो आणि मराठी चित्रपटात काम करून प्रत्येक भूमिकेत आपलं वेगळेपण दाखवून दिल. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मुळे ते सर्वांच्याच अधिक परिचयाचे झाले आहेत.

नुकतेच भाऊंच्या ५०व्यावाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. हे खास सेलिब्रेशनमध्ये भाऊंच्याकुटुंबीयांसमवेत पार पडले. त्याचबरोबर चला हवा येऊ द्या चे कलाकार श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके हे देखील उपस्थित होते. भाऊने त्यांच्या वाढदिवसाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

काॅमेडीचे बादशाह भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां!

Bhau Kadam Birthday Celebration Video

https://youtu.be/Pvx5LeoeKvQ

Tags: Bhau Kadam Birthday celebration, Bhau kadam Birthday Party, Bhau kadam Birthday, Bhau Kadam 50th Birthday

Leave a Comment