अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘सोनाली कुलकर्णी’. विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून सोनालीने रसिकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. नटरंग या सिनेमातून तिला खरी प्रसिद्धी मिळाली. ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाली कुलकर्णी कोणाला डेट करतेय याची चर्चा रंगली होती. तसंच तिनंही तिच्या जोडीदाराबद्दल कल्पना दिली होती. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून या वर्षी दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र आहे.
सोनालीने नुकतच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अॅडव्हेंचर व्हि़डीओ पोस्ट करून तिने तिचा होणारा ‘पार्टनर’ कोण हे सांगितलं. “माझ्या जोडीदारासोबत मी एका नवीन प्रवासाला सुरूवात करतेय. चढ-उतार आणि साहसासाठी आम्ही सज्ज आहोत.” असं कॅप्शन देत सोनालीने हा अॅडव्हेंचर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने कुणालला टॅग केले आहे. सोनाली सध्या दुबईमध्ये कुणालसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
कुणाल बेनोडेकर हा मूळचा लंडनचा आहे. कुणाल हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटेंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाली लवकरच कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही बोललं जातं आहे.
Title: Sonali Kulkarni is in relationship with Kunal Benodekar
Sonali Kulkarni Boyfriend Kunal Benodekar Photo
Tags: Sonali Kulkarni Boyfriend, Sonalee Kulkarni Boyfriend, sonali kulkarni husband, Sonali kulkarni wedding, sonali kulkarni marriage, sonali kulkarni and kunal benodekar