Lata Bhagwan Kare Biography in Marathi

“मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरूच आहे आणि पुढेही माझ्या जीवनात असाच संघर्ष सुरू असेल. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जिंकणे चिरतरुण आहे. एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वतःला ओळखण्याचा अवकाश आहे.” असे सांगणाऱ्या ‘लता भगवान करे – एक संघर्षगथा’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला तर आज आपण लता भगवान करे यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लता भगवान करे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील माळोना गावातल्या. राहत्या गावात उत्पन्नाच काहीच साधन उपलब्ध नसल्या कारणांमुळे हे कुटुंब ४ वर्षापूर्वी बारामती तालुक्यातील जळोची गावात आल. बारामती शहरालातील जळोची गावात लता करे या भाडेतत्त्वावर राहतात. अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या लता करेंनी जरा ही न डगमगता आपल्या तीन मुली आणि एक मुलासह संसाराचा गाडा हाकला. या कुटुंबाने मोलमजूरी करून आपल्या तीन मुलींची आणि मुलाचे लग्न केले. लता करेंचे पती भगवान करे हे हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त आहेत. तर मुलगा सुनीलने शिक्षण गरिब परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले. अपुऱ्या शिक्षणामुळे त्याला कायम स्वरूपी नौकरी भेटत नाही.  

बारामतीमध्ये दरवर्षी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात येत. या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजे लता भगवान करे. नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायांनी धावणाऱ्या ६५ वर्षाच्या लताबाई करे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला तो आपल्या कुटुंबासाठी. २०१३ मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावल्या आणि खुल्या प्रवर्गातून प्रथम क्रमांक देखील पटकावला. स्पर्धेच्या एक दिवस अगोदर अजारी असणार्‍या लताबाईंनी दिसत होती ती बक्षिसाची पाच हजाराची रक्कम. या रक्कमेतून पतीच्या हृदयविकाराच्या तपासण्या करता येण त्यांना शक्य होत.

यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये भाग घेतला तो घराचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि अडीच किलोमीटरच अंतर सहजपणे पार केल. केवळ एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा लताबाईंनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर लता करे या केवळ राज्यातच नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. माध्यमांनी दखल घेतल्यानंतर त्यांना मदतही मिळाली.

आता मात्र त्या वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांच्या जीवनकथेवर आधारित लता भगवान करे हा मराठी चित्रपट १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. एका अशिक्षित पण जिद्दी महिलेची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसोमर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे लता करे याच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. लता करे यांचे पती भगवान व मुलगा सुनील हे दोघेही चित्रपटात झळकले आहेत.

Tags: Lata Bhagwan Kare, Lata Kare, Lata Bhagwan Kare Biography, Lata Kare Biography, Lata Kare Story in Marathi, Lata Bhagwan Kare story in marathi, lata kare family, lata bhagwan kare family, lata bhagwan kare movie

Leave a Comment