Tharal Tar Mag Asmita : ‘ठरलं तर मग’ ही मराठी मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रं घराघरांत ओळखीची झाली आहेत. सायली, अर्जुन, प्रतिमा, प्रिया, कल्पना, चैतन्य, अस्मिता अशी सगळी पात्रं प्रेक्षकांच्या मनाला भावली आहेत. विशेषत: अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. आता मोनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यातून एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.
मोनिका दबडे लवकरच खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या पतीसोबत, चिन्मय कुलकर्णी याच्यासह फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. यावेळी तिने सांगितलं होतं की, एप्रिल २०२५ मध्ये ते दोघं त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. ही बातमी मिळाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
डोहाळे जेवणाचा खास सोहळा
आता नुकतंच मोनिकाचं डोहाळेजेवण मोठ्या आनंदात पार पडलं आहे. या खास दिवशी मोनिकाने सुंदर अशी तयारी केली होती. तिने डोहाळेजेवणासाठी आकर्षक साडी नेसली होती, त्यावर फुलांचे दागिने घातले होते. नाकात नथ, आणि साडीवर ‘आई’ असं लिहिलेला बॅच लावून तिने तिचा लूक पूर्ण केला होता. मोनिकाचा हा डोहाळेजेवणातील लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
Kokan Hearted Girl Ankita Walavalkar : कोकण हर्टेड अंकिता ने घेतली नवीन कार म्हणाली हे सगळं कुणाल…
मोनिकाच्या मेकअप आर्टिस्ट साईने तिच्या डोहाळेजेवणाच्या लूकची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या फोटोमध्ये मोनिकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “तुम्ही सगळे मला ‘ठरलं तर मग’ मालिकेत बघत असता. मी अस्मिता ही भूमिका साकारतेय. मात्र माझं खरं नाव मोनिका दबडे आहे. अस्मिताची भूमिका साकारताना मला खूप मजा येते. त्या वेळी मी वेगळ्या रुपात असते. आज माझ्या डोहाळेजेवणासाठी साईने मला एक वेगळा लूक दिला आहे. आता मला सातवा महिना लागला आहे आणि खूप छान वाटतंय.”
सोशल मीडियावर मोनिका कायम सक्रिय
मोनिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील विविध गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो कधी येणार, याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Swarada Thigale : नवीन मुक्ता तेजश्री प्रधान बरोबर झालेल्या तुलने मुळे भडकली!
मालिकेतील अस्मिताच्या भूमिकेबद्दल
‘ठरलं तर मग’ मालिकेत मोनिका अस्मिता हे नकारात्मक पात्र साकारत आहे. अस्मिता ही अर्जुनची सख्खी बहीण आहे आणि ती सायलीच्या विरोधात सतत काही ना काही कुरापती करत असते. तिची भूमिका जरी नकारात्मक असली तरी सुभेदार कुटुंब तिच्याशिवाय अपूर्ण वाटतं. मालिकेतील अस्मिताचं पात्र प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान टिकवून आहे, आणि त्यात मोनिकाच्या उत्कृष्ट अभिनयाचा मोठा वाटा आहे.
Tejshri Pradhan : तर या कारणामुळे तेजश्री प्रधान ने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली, ऐकून धक्का बसेल..
मोनिकाच्या आयुष्यातील या खास क्षणांना तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिच्या आगामी फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत.