Kokan Hearted Girl Ankita Walavalkar : गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती येत्या काही दिवसांत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून, ‘बिग बॉस मराठी सीझन 5’च्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली आहे. तिच्या खास शैलीमुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सध्या अंकिताची लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. पुढच्या महिन्यात ती आणि कुणाल भगत विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीसोबतच अंकिताच्या आयुष्यात आणखी एका खास गोष्टीची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून “ती येतेय” किंवा “ती आलीय” अशा पोस्ट शेअर करत होती. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. अखेर अंकिताने या गूढ पोस्टमागचं रहस्य उलगडलं आणि चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं.
Swarada Thigale : नवीन मुक्ता तेजश्री प्रधान बरोबर झालेल्या तुलने मुळे भडकली!
अंकिताच्या आयुष्यात आलेली ही नवी पाहुणी दुसरी, तिसरी कोणी नसून तिची नवीकोरी आलिशान ऑडी कार आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या नवीन कारची झलक शेअर केली. “आवडी आली” असे कॅची कॅप्शन देत तिने तिच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली.
तिच्या पोस्टमधील फोटोंमध्ये अंकिता आणि कुणाल त्यांच्या आलिशान ऑडी कारसोबत दिसत आहेत. नुकतीच अंकिताने तिची आधीची कार विकली होती. त्याबाबतही तिने चाहत्यांना सांगितलं होतं की, ती नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं की, “सध्या दोन-तीन गाड्यांमध्ये माझा गोंधळ चालू आहे, म्हणून जुनी गाडी विकली.” अखेर तिने तिचा निर्णय जाहीर करत ही नवी गाडी घेतल्याचं सर्वांना सांगितलं.
अंकिता सध्या तिच्या लग्नाच्या तयारीमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन 5’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर 12 ऑक्टोबरला तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांसमोर आणली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं की, ती आणि कुणाल फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहेत. अंकिताने याआधीच स्पष्ट केलं होतं की, त्यांचा शाही विवाह सोहळा कोकणात पार पडणार आहे.
अंकिता आणि कुणाल सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत, खरेदीत व्यस्त आहेत. कुणाल भगतबद्दल बोलायचं झालं, तर तो एक प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. संगीत दिग्दर्शनाबरोबरच तो एक गायक आणि लेखकदेखील आहे. कुणालने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी अप्रतिम संगीत दिलं आहे.
Tejshri Pradhan : तर या कारणामुळे तेजश्री प्रधान ने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली, ऐकून धक्का बसेल..
अंकिता आणि कुणालच्या शाही विवाह सोहळ्याची चाहत्यांमध्येही खूप उत्सुकता आहे. लग्नसोहळा आणि अंकिताच्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.