Lakhat ek Maza Dada : झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत दाखवलेलं सूर्या आणि त्याच्या चार बहिणींचं गोड नातं प्रेक्षकांना खूप भावतंय. या मालिकेत भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आणि आपुलकी फार सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका घराघरात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, मालिकेतील एका नव्या प्रोमोमुळे सध्या प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येतेय.
झी मराठीने काही दिवसांपूर्वी या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये मुख्य पात्र सूर्या आणि त्याची लहान बहीण भाग्यश्री यांच्यावर आधारित एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. भाग्यश्री शाळेच्या सहलीला जायला निघते, त्यावेळी ती आपल्या दादाला म्हणजे सूर्याला सांगते की, “मी स्वेटर घालीन, अरबट-चरबट खाणार नाही, आणि एकटी कुठे फिरणार नाही.” सूर्या देखील तिच्यावर विश्वास ठेवतो. पण या सहलीत भाग्यश्रीला त्रास देणारा तिच्या वर्गातील एक मुलगा तिच्याविरोधात कट रचतो.
प्रोमोमध्ये पुढे दाखवलं जातं की, भाग्यश्रीच्या कपड्यांना काहीतरी चिकटलेलं असतं. ते पाहून ती स्वतःशीच बोलते की, “ड्रेस बदलायला हवा.” ती बाथरूममध्ये कपडे बदलायला जाते. पण तो मुलगा लपून तिच्यावर पाळत ठेवत असतो. ती बाथरूममध्ये गेल्यावर तो मुलगा दरवाजाला बाहेरून कडी लावतो आणि खिडकीतून मोबाईल ठेवून तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी भाग्यश्रीला काहीतरी विचित्र वाटतं आणि ती मोठ्याने विचारते, “कोण आहे?” हे ऐकताच तो मुलगा तिथून पळून जातो. दरम्यान, भाग्यश्री दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा उघडत नाही. ती मोठ्याने “दादा!” अशी हाक मारते.
Reshma Shinde Husband : रेश्मा शिंदेचा पती काय करतो? अखेर आल समोर, अभिनेत्रीने केला खुलासा..
दुसरीकडे, सूर्या भाग्यश्रीची काळजी करत तुळजाशी बोलत असतो. तुळजा त्याला समजावत असताना सूर्याला भाग्यश्रीची हाक ऐकू येते आणि त्याला तिच्या अडचणीची जाणीव होते. प्रोमो इथेच संपतो, पण या घटनेमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.
या प्रोमोवर प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनीला सोशल मीडियावर टीका केली आहे. अनेक प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की, अशा प्रकारचे प्रसंग दाखवणं योग्य नाही. एका प्रेक्षकाने लिहिलं, “अशा गोष्टी मालिका किंवा सिनेमांत दाखवून त्याचा विपरीत परिणाम होतो. घरात सगळे मिळून मालिका बघत असताना अशा गोष्टी आल्याच तर चॅनेल बदलावं लागतं. मुलांवर याचा चुकीचा परिणाम होतो.”
Hruta Durgule : लग्न होऊनही ही अभिनेत्री अभिनेत्याला म्हणतेय ‘तू मला अगोदर का नाही भेटलास!’
दुसऱ्या प्रेक्षकाने लिहिलं, “मालिकेचा मूळ विषय खूप चांगला आहे. भावाबहिणीच्या नात्यातील गोडवा दाखवणारी ही मालिका अगदी हृदयाला भिडणारी आहे. पण अशा गोष्टी दाखवण्याची गरज नव्हती. झी मराठीने यावर विचार करणं गरजेचं आहे.”
तिसऱ्या प्रेक्षकाने नाराजी व्यक्त करत म्हटलं, “आधीच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यात अशा गोष्टी दाखवल्या तर ते कशाला प्रोत्साहन मिळेल? मालिकेने ही कथा सकारात्मक आणि प्रेरणादायी ठेवायला हवी होती.”
Lek Ladki Yojna : सरकार मुलींना देणार १ लाखांची मदत.. तुम्ही पात्र आहात का लगेच चेक करा!
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने भावाबहिणीच्या नात्याची गोड बाजू मांडून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र, या प्रकारच्या प्रसंगांमुळे मालिकेच्या मूळ भावनेला धक्का पोहोचतोय, असं प्रेक्षकांचं मत आहे.