Bigg Boss Viral Paper : लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असं आपण नेहमीच ऐकत आलोय. त्यांचं मन अगदी स्वच्छ आणि निरागस असतं. पण कधी कधी त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, हे समजणं खूप अवघड असतं. अशाच एका मुलाच्या उत्तरपत्रिकेतील मजेशीर उत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मुलांच्या परीक्षांमधली उत्तरं अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, काही वेळा ती उत्तरं इतकी मजेशीर असतात की, पाहणाऱ्याला हसून हसून पोट दुखायला लागतं. असाच एक किस्सा नुकताच समोर आला आहे, ज्यामुळे तुम्हीही हसून गडबड व्हाल.
शाळेतल्या परीक्षांमध्ये अनेकदा असं होतं की, मुलांना प्रश्न समजत नाहीत किंवा योग्य उत्तर येत नाही, तेव्हा काहीजण आपलं उत्तर लिहून काढतात. पण काही मुलं अशी असतात की, ती वेगळंच काहीतरी उत्तर लिहून जातात. अशीच एक गमतीशीर घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका मुलाच्या उत्तरपत्रिकेने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे, आणि हे उत्तर पाहून हसू न थांबता राहणार नाही.
सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत होता. हा सीझन तुफान गाजला, आणि त्याची लोकप्रियता इतकी वाढली की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या तोंडात याच सीझनची चर्चा होती. या सीझनमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते स्पर्धक सूरज चव्हाणने. तो शोचा विजेता ठरला आणि त्याचं नाव घराघरात पोहोचलं. मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन्स तयार झाले, आणि त्याचे संवादही लोकांमध्ये लोकप्रिय झाले. त्याचा “गुलीगत बुक्कीत टेंगुळ” हा डायलॉग तर प्रचंड प्रसिद्ध झाला. त्याचाच परिणाम आता लहान मुलांवरही दिसून येत आहे, आणि शाळांमध्येही मुलं बिग बॉस आणि सूरज यांचीच चर्चा करताना दिसत आहेत.
Free Mobile Phone : महाराष्ट्रातील या महिलांना मिळणार सरकारकडून मोफत मोबाईल फ़ोन..
आता हा किस्सा काय आहे ते पाहुयात. एका शाळेत परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत एका मुलाला प्रश्न विचारला होता, “सूर्याचं दुसरं नाव काय आहे?” यावर मुलाने जे उत्तर लिहिलं ते वाचून तुम्हाला नक्की हसू येईल. त्याने उत्तर लिहिलं होतं, “गुलीगत”. हा शब्द पाहून लगेचच लक्षात येईल की, बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाणने वापरलेला त्याचा प्रसिद्ध डायलॉग या मुलाच्या मनात इतका घर करून बसला की, त्याने परीक्षेतही तेच उत्तर दिलं.
हे उत्तर पाहून लोकांना मोठं आश्चर्य वाटलं आणि हसूही आलं. या मुलाने लिहिलेलं उत्तर सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरलं आणि लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहीजणांनी यावर गंमतीशीर टिप्पणी केली, तर काहींनी यामागे पालकांचीच चूक असल्याचं म्हटलं. एका युजरने लिहिलं, “हा पालकांचा दोष आहे, त्यांनी मुलांना असे कार्यक्रम पाहू दिलेच नाही पाहिजेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “मुलगाही खूप हुशार दिसतो, त्याने मोठ्या कल्पकतेने उत्तर दिलंय.”
सध्या हा फोटो आणि मुलाचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांची त्यावर वेगवेगळी मतं येत आहेत. काहीजण हसून आनंद घेतायत, तर काही पालक शिक्षणावरून गंभीर चर्चा करतायत. मात्र, या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की आजकाल मुलांवर टीव्ही शो, खासकरून बिग बॉस सारख्या लोकप्रिय शोचा खूप परिणाम होतो आहे.