Apurvaa Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हे नाव आज मराठी मनोरंजन क्षेत्रात खूप परिचित आहे, आणि त्याचं कारण म्हणजे तिची रात्रीस खेळ चाले या मालिकेतली ‘शेवंता’ ही भूमिका. या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली . शेवंता हे तिचं पात्र इतकं गाजलं की आजही लोक तिला अपूर्वा ऐवजी ‘शेवंता’ म्हणूनच ओळखतात. मात्र, प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अपूर्वाने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले होते, पण तिने हा निर्णय का घेतला, याबद्दल तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितल आहे.
अपूर्वाने नुकतीच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेच्या निर्मात्यांसोबत झालेल्या वादावर प्रकाश टाकला. तिने या मुलाखतीत उघडपणे सांगितलं की तिला मालिका सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागला आणि त्यावेळी नेमक काय झालं होतं.
अपूर्वाने काय सांगितल?
मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं, “तुला मिळालेलं कोणतं रिजेक्शन सगळ्यात जास्त लक्षात राहिलं?” यावर अपूर्वाने अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलं. ती म्हणाली, “आजही जेव्हा मी कुठे जाते, तेव्हा लोक मला शेवंता म्हणूनच हाक मारतात. त्या पात्राने मला खूप ओळख मिळवून दिली, पण त्याच पात्राला मिळालेलं रिजेक्शन माझ्या मनाला सगळ्यात जास्त लागलं आहे.”
तिने पुढे सांगितलं की मालिकेच्या निर्मात्यांनी एकदा तिला वादाच्या वेळी खूप कठोर शब्दांमध्ये सांगितलं होतं, “तू शेवंता केलीस ते काही ग्रेट नाही केलंस. दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीने ते केलं असतं, तरीही ते छानच झालं असतं. कारण मुळात आमच्या लिखाणात ती मज्जा होती.” अपूर्वाच्या मते, ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती. ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या पात्रात जीव ओतून काम करता, तेव्हा अशा गोष्टी एक कलाकार म्हणून खूप दुखावतात.”
मेहनतीचं मुल्यांकन न झाल्याची खंत
अपूर्वाने यावेळी तिने घेतलेल्या कष्टांबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मी रोज बारा तासांचा प्रवास करून या मालिकेत काम करत होते, झोप पूर्ण होत नव्हती, पण तरीही शेवंता हे पात्र साकारण्यासाठी मी मनापासून मेहनत घेतली. त्या काळात मी स्वतःला पूर्णपणे या पात्रात झोकून दिलं होतं.” पण जेव्हा तिला असं सांगितलं गेलं की, ‘हे कुणीही करू शकतं,’ तेव्हा मी खूप निराश झाले.
अपूर्वाच्या मते, ती पात्रासाठी घेतलेली मेहनत आणि त्यावर मिळालेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती. ती म्हणाली, “माझ्या अपेक्षा काही फार मोठ्या नव्हत्या. बेसिक म्हणजेच साध्या गोष्टी होत्या – मला फक्त तितके पैसे पाहिजे होते, ज्यावर माझं घर चालू शकेल.”
Aarya Jadhav : थोबाडीत मारुन सुद्धा आर्याला घरातच टेवल असत तर.. केदार शिंदे स्पष्टच बोलले..
मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय
अपुर्रवाने स्पष्ट केलं की, निर्मात्यांनी दिलेली ती टीका तिच्या मनावर इतकी परिणामकारक ठरली की तिला मालिकेतून बाहेर पडावं लागलं. तिला वाटलं की आता हे पुढे नेण्यात काही अर्थ नाही. ती म्हणाली, “माझं असं झालं की, आता ठिक आहे, मला बघायचंय की कोणती अभिनेत्री इतक्या ताकदीने ही भूमिका साकारते.
तिने या मुलाखतीत सांगितलं की, मालिकेतील तिच्या कामाचं खरं मूल्यमापन कसं झालं नाही, याची तिला खंत वाटते. अपूर्वाला असं वाटतं की कलाकार म्हणून आपलं काम, आपली मेहनत ओळखली जाणं फार महत्त्वाचं असतं, पण तिच्या बाबतीत ते तसं घडलं नाही.