Aarya Jadhav : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसला, त्यामागे वाद, भांडणं आणि घरातील स्पर्धकांमधील तणावाचं वातावरण कारणीभूत होतं. या सीझनमध्ये असे काही प्रसंग घडले, जे मागच्या सीझनमध्ये फारसे पाहायला मिळाले नव्हते. विशेषतः आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील वादामुळे एक मोठी Headline बनली. आर्याने निक्कीवर हात उचलल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली .आर्याच्या या कृतीमुळे काही प्रेक्षक नाराज झाले तर काही खुश! आर्याने नियम मोडल्याचा ठपका ठेवत आर्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं, ज्यावर काही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आर्याने नियमांचं उल्लंघन केलं असलं तरीही, सोशल मीडियावर तिला बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला. मात्र, बिग बॉसच्या नियमांप्रमाणे कोणत्याही स्पर्धकाला हिंसा करण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा निर्णय ग्नेयात आला होता.
आर्या जाधवला घराबाहेर काढण्याच्या निर्णयावर चॅनल हेड केदार शिंदे यांनी सुरुवातीला बोलणं टाळलं होतं. एका पूर्वीच्या मुलाखतीत त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत केदार शिंदे यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आणि आर्याला घराबाहेर का काढावं लागलं, याची कारणं सांगितली.
केदार शिंदे यांचं स्पष्टीकरण
आर्याला घरातच एखादी शिक्षा देऊन ठेवता आलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना केदार शिंदे म्हणाले की, प्रत्येक खेळाचे काही ठरलेले नियम असतात. बिग बॉसमध्ये तुम्ही एकमेकांवर आरोप करू शकता, तर्क वितर्क करू शकता, वाद घालू शकता, आणि कधीकधी धक्का-मुक्की होऊ शकते, परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हात उचलू शकत नाही. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा नियम डावलला असता आणि आर्याला घरातच ठेवलं असतं, तर इतर १६ स्पर्धकांनीही त्याचं अनुकरण केलं असतं.
Ladki Bahin Yojna Paise : या महिलांच्या खात्यावर जमा होणार 7500 रुपये! यात तुम्ही आहात का पाहा..
केदार शिंदे यांनी सांगितलं की, आर्याच्या घटनेनंतर त्यांनी तीन दिवस विचार केला आणि एंडमॉल या प्रॉडक्शन कंपनीसोबत चर्चा केली. सर्व नियम तपासून निर्णय घेतला गेला की आर्याने नियम मोडल्यामुळे तिच्यावर कारवाई करावीच लागेल. त्यामुळे तिला घराबाहेर काढावच लागेल.
बिग बॉसचा सहावा सीझन फक्त ७० दिवसांचा का?
या मुलाखतीत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की, बिग बॉस मराठीचा हा सीझन ७० दिवसांतच का संपवण्यात आला, आणि पुढच्या सीझनमध्ये हेच नियम लागू होतील का, की पुढचा सीझन पुन्हा १०० दिवसांचा असेल?
यावर उत्तर देताना केदार शिंदे यांनी स्पष्ट केलं की, मी सध्या कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्ये काम करतो आणि अशा काही गोष्टी मॅनेजमेंटच्या हातात असतात. मॅनेजमेंट जेव्हा कोणताही निर्णय घेतं, तेव्हा त्याचे फायदे-तोटे सर्व बगीतले जातात . या सर्व बाबींचा विचार करून, हा सीझन ७० दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला गेला.
त्यामुळे हा निर्णय प्रेक्षकांना आवडला नसला तरी, व्यवसायिक निर्णय घेणे आवश्यक असतं, असं केदार शिंदे यांनी स्पष्ट केलं.