Ankita Walavalkar Husband : अखेर अंकिता वालावलकर ने सांगितलच तिचा होणारा नवरा कोण आहे? नाव ऐकून धक्का बसेल..

Ankita Walavalkar Husband : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेली अंकिता प्रभू वालावलकर, जी ‘बिग बॉस मराठी’ची स्पर्धक होती, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता सध्या तिच्या ‘कोकण हार्टेड बॉय’बद्दल चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती की हा ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण आहे? अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याविषयी माहिती देण्याचे टाळत होती. मात्र दसऱ्याच्या खास दिवशी अंकिताने अखेर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Ankita Walavalkar Husband
Ankita Walavalkar Husband

जेव्हा अंकिताने तिच्या कोकण हार्टेड बॉयची घोषणा केली, तेव्हापासून तिचे चाहते त्याचा शोध घेऊ लागले होते. अखेर चाहत्यांनी लावलेला अंदाज बरोबर ठरला. अंकिताचा होणारा नवरा म्हणजे कुणाल भगत हाच आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांसमोर कुणालची ओळख करून दिली आहे.

BBM5 Janhavi Killekar : या कारणामुळे संग्राम चौगुले मला घरात एनको होते! जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक खुलासा!

तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सूर जळले…” आणि त्यानंतर एका भावनिक पोस्टमध्ये आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करत तिने पुढे लिहिलंय, “प्रेम म्हणजे एकमेकांसाठी जगणं आहे, हे तू मला शिकवलंस. काळाच्या ओघात कळलंच नाही कधी आयुष्य बदललं. तू भेटलास आणि पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण झाली. वचन देते की, एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी बनेन. दसऱ्याच्या शुभेच्छा!”

याशिवाय अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिला शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात कुणालने लिहिलंय, “तू आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम काय असतं हे कळलं. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे आपण लग्न करतोय. तुला हसवणं आणि तुला खुश ठेवणं ही आता माझी सवय बनली आहे, आणि ही सवय मी नेहमी जपेन… Trust Me. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा!”

Dhananjay Powar : आपली पायरी आपणच… अस का म्हणतोय डी पी.. बिग बॉस नंतर अस काय झाल?

अंकिताच्या आणि कुणालच्या या प्रेमकथेने त्यांच्या चाहत्यांना उत्साहित केलं आहे. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत.

Leave a Comment