Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : ‘बिग बॉस मराठी 5’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाणने चांगलीच धमाल उडवली. त्याच्या या परफॉर्मन्समुळे प्रेक्षक आणि घरातले इतर सदस्य खूप प्रभावित झाले होते. याच कारणामुळे शोचे होस्ट रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूरजचं मनापासून कौतुक केलं. जरी सूरज कॅप्टन झाला नसला, तरी त्याने टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यामुळे प्रेक्षकांनीही त्याच्या खेळीला दाद दिली.
पहिल्या दोन आठवड्यांत सूरज फारसा नजरेत नव्हता, पण तिसऱ्या आठवड्यात त्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये जबरदस्त खेळी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याची मेहनत प्रेक्षकांनी आणि घरातील सदस्यांनीही मान्य केली. रितेशनेही त्याच्या खेळाची स्तुती करताना म्हटलं, “या आठवड्यात एक हिरो जन्माला आला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. अख्खं घर म्हणतं त्याला गेम कळत नाही, पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला.”
Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : रितेश देशमुख होस्ट म्हणून अगदीच फुसका वाटतो!
मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या एका माजी स्पर्धकाने असं मत व्यक्त केलंय की फक्त ‘सिंपथी’च्या जोरावर सूरज पुढे जाऊ शकत नाही. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आरती सोळंकीने तिचं मत मांडलं. ती म्हणाली, “मी गरीब आहे, साध्या घरातून आलेय, हे बोलून चालत नाही. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे. त्यामुळे यावर सहानुभूती दाखवून काही होणार नाही. मीसुद्धा गरीब आहे, चाळीत राहणारी मुलगी आहे. त्यामुळे गरीब माणूस जिंकलं तर नक्कीच आनंद होईल. पण काहीही खेळ न खेळता फक्त सिंपथीवर तो पुढे गेला आणि जिंकलं, तर पुढचा सिझन मी बघणार नाही. कारण बिग बॉसचा खेळ खूप कठीण आहे.”
Sumit Pusawale : बाळूमामा फेम अभिनेत्याचा गौफ्य स्फोट , ते पत्र मी अजूनही..
‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेशने मात्र सूरजचं मनापासून कौतुक केलं होतं. त्याने सांगितलं, “झुंडीत भेडं येतात, शेर मात्र एकटाच येतो. तीन आठवड्यांत पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसली. निक्की आणि जान्हवीसुद्धा घाबरलेल्या वाटल्या. कोणालाही कमी लेखू नका. हे या आठवड्यात सिद्ध झालं. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही खेळू नका. सर्वांनाच समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका.” तसंच, रितेशने सूरजला पुढेही निर्धास्तपणे खेळण्याचा सल्ला दिला.
सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’च्या तिसऱ्या आठवड्यात जो खेळ केला, त्याने तो प्रेक्षकांच्या आणि इतर स्पर्धकांच्या नजरेत आला. त्याच्या या परफॉर्मन्समुळे त्याचं नाव चर्चेत आलं, पण त्याला पुढच्या टप्प्यांत यश मिळवण्यासाठी फक्त सहानुभूतीवर अवलंबून राहून चालणार नाही, असं आरती सोळंकीचं म्हणणं आहे. तिसऱ्या आठवड्यात सूरजचा गेम सगळ्यांना दिसला, पण पुढील आठवड्यांमध्ये त्याने आपला खेळ अजून चांगला करावा, असंही वाटतं.