Bigg Boss Marathi 5 Purushottam Patil : मला बिग बॉसच्या घरात अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती..

Bigg Boss Marathi 5 Purushottam Patil : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi )च्या पाचव्या सीझनचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे, आणि मागील दोन आठवड्यांप्रमाणे या आठवड्यातही घरात ताणतणाव आणि भांडणं वाढली आहेत. या आठवड्यातलं मोठं वादग्रस्त प्रकरण निक्की तांबोळी आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यात झालं आहे. निक्कीची वैयक्तिक वस्तू हाताळल्यामुळे ती पंढरीनाथ यांच्यावर तसेच अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांच्यावरही चिडली. या भांडणाचा प्रोमो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Purushottam Patil
Purushottam Patil

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पहिल्या आठवड्यात घरातून बाहेर गेलेल्या पुरुषोत्तमदादा पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पुन्हा एकदा स्पर्धकांना चांगलाच धारेवर धरलं. दोन्ही गटातील सदस्यांना रितेशने चांगलंच सुनावलं. विशेषतः निक्की तांबोळीप्रमाणे जान्हवी किल्लेकरलाही रितेशने चांगलाच खडसावलं. वर्षा उसगांवकर यांचा अपमान झाल्याच्या कारणावरून रितेशने जान्हवीला थेट घराबाहेर काढण्याची धमकी दिली. तरीही, दुसऱ्या बाजूला रितेशने काही स्पर्धकांचं कौतुकही केलं. विशेष म्हणजे, या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर गेला नाही.

Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण घेतो तब्बल एवढे पैसे, बिग बॉस मराठी मधील घरातील सदस्यांना मिळत एवढं मानधन

दुसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, सुरज चव्हाण, आणि निक्की तांबोळी हे सहा सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. मात्र, ‘कलर्स मराठी’ एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत असल्यामुळे या आठवड्यात कोणालाही घराबाहेर जाण्यापासून वाचवलं. पण या सहा स्पर्धकांची नॉमिनेशन पुढच्या आठवड्यासाठी कायम ठेवण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यात घराबाहेर गेलेले पुरुषोत्तमदादा पाटील यांनी आपली खंत व्यक्त करत, “अजून एक आठवडा संधी मिळायला हवी होती,” असं म्हटलं आहे.

Colors Marathi new Serial Durgaa : कलर्स मराठी च्या नव्या दुर्गा मालिकेत रंग माझा फेम अभिनेत्री दिसणार..

पुरुषोत्तमदादा पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मला बिग बॉसच्या घरात अजून एक आठवडा राहायची संधी मिळायला हवी होती. तुम्हाला काय वाटतं, हे नक्की सांगा.” ही पोस्ट त्यांनी ‘कलर्स मराठी’सह विविध वृत्तवाहिन्यांना टॅग केली आहे, आणि त्यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.

Arbaz Patel Bigg Boss Marathi 5 : महाराजांचा जयजयकार न करणारा अरबाज आहे तरी कोण?

“दादा, सोनं चांदीचं मोल फक्त सोनारालाच कळतं, लोखंड घेणाऱ्याला नाही,” “हो नक्कीच, दादा…तुम्ही खूप चांगलं खेळत होतात,” “हो, तुम्हाला संधी मिळायला हवी होती. आम्हाला अजून बघायचं होतं,” अशा अनेक प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

keyword : Bigg Boss Marathi 5, purushottam dada Patil, Bigg Boss marathi

Leave a Comment