How Movies Earn Money : चित्रपट हिट ठरला की फ्लॉप हा मुद्दा मुख्यतः बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून असतो. भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून तेथील प्रतिष्ठित सदस्य बनले आहेत. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच, त्याच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज काढणे, त्यासाठी आलेला मूळ खर्च आणि इतर अनेक गोष्टी बातम्यांमध्ये समोर येतात. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रत्येक आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) मोजण्याची प्रक्रिया किती जटिल असते, हे तुम्हाला माहिती आहे का? चला, याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
कोणत्याही चित्रपटाच्या निर्मितीत निर्माता हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. चित्रपट बनवण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च निर्मात्यावरच असतो. निर्माता चित्रपट तयार करताना जेवढी रक्कम गुंतवतो, ती रक्कम चित्रपटाचे बजेट म्हणून ओळखली जाते. या बजेटमध्ये कलाकारांचे मानधन, क्रू मेंबर्सचा खर्च, जेवण, राहण्याची सोय, तंत्रज्ञानासाठी लागणारा खर्च यांचा समावेश असतो. याशिवाय, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला खर्च देखील या बजेटमध्ये समाविष्ट असतो. म्हणजेच, निर्मात्याने गुंतवलेल्या रकमेला चित्रपटाचे मूळ बजेट असे म्हणता येईल.
चित्रपटाच्या वितरणामध्ये वितरकाची भूमिका महत्त्वाची असते. वितरक हा निर्माता आणि थिएटर मालक यांच्यातील मध्यस्थ असतो. चित्रपट निर्मिती झाल्यावर निर्माता त्याचे हक्क वितरकांना विकतो. काही वेळा निर्माते त्रयस्थ व्यक्तींच्या माध्यमातून वितरकांना चित्रपटाचे हक्क विकतात, ज्यामध्ये नफा किंवा तोटा त्रयस्थ पक्षाच्या वाट्याला येतो.
वितरक आणि थिएटर मालक यांच्यात चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी करार करण्यात येतो. भारतात दोन प्रकारची सिनेमागृहे आहेत – एक म्हणजे सिंगल स्क्रीन आणि दुसरी म्हणजे मल्टीप्लेक्स चेन. चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून किती नफा होईल हे करारामध्ये ठरवले जाते. चित्रपटाच्या कलेक्शनचे संकलन सुरुवातीला थिएटर मालकांकडून केले जाते. राज्य सरकारकडे विशिष्ट करमणूक कर जमा करावा लागतो, जो प्रत्येक राज्यात वेगवेगळी टक्केवारी असू शकतो. करमणूक कर भरल्यानंतर उर्वरित कलेक्शनमधील काही भाग वितरकाला परत केला जातो, जो आधीच झालेल्या करारानुसार ठरवला जातो.
थिएटर मालकांकडून साप्ताहिक आधारावर वितरकांना परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यास, पहिल्या आठवड्यात एकूण कलेक्शनपैकी ५० टक्के, दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३७ टक्के आणि चौथ्या आठवड्यात ३० टक्के कलेक्शनची रक्कम वितरकाला दिली जाते. सिंगल स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित झाल्यास वितरकाला दर आठवड्यापासून चित्रपट चालू राहेपर्यंत एकूण कमाईच्या ७० ते ९० टक्के रक्कम मिळते. अशाप्रकारे, वितरकाचा नफा किंवा तोटा हा चित्रपट थिएटर मालकांना विकण्याच्या खर्चावर आणि वितरकाला मिळणाऱ्या हिस्स्यावर आधारित असतो. यावरून बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) ठरवले जाते.
Khushbu Tawade Leaves Serial : म्हणून खुशबू तावडेने मलिक सोडली.. खरं कारण आलं समोर
उदाहरणार्थ, एका मल्टिप्लेक्समध्ये एका तिकिटाची सरासरी किंमत २५० रुपये आहे. त्यात एकूण १०० लोकांनी चित्रपट पाहिला आणि संपूर्ण आठवड्यात चित्रपटाचे १०० शो आयोजित केले गेले. याचा अर्थ, चित्रपटाच्या एका आठवड्याचे कलेक्शन २५०x१००x१०० = २५,००,००० रुपये असेल. यामध्ये ३० टक्के करमणूक कर वजा केल्यावर एकूण १७,५०,००० रुपये शिल्लक राहतात. करारानुसार, या रकमेतील ५० टक्के म्हणजेच ८,७५,००० रुपये पहिल्या आठवड्यात वितरकाला दिले जातात. दुसऱ्या आठवड्यात ४२ टक्के अशाप्रकारे चित्रपट चालू राहेपर्यंत वितरकाला पैसे मिळतात.
सिंगल स्क्रीनवरील चित्रपटांच्या बाबतीत, तिकिटाची किंमत १५० रुपये असते. संपूर्ण आठवड्यात १०० शो दाखवले जातात आणि प्रत्येक शोमध्ये १०० लोक चित्रपट पाहतात. यानुसार, संपूर्ण आठवड्यासाठी सिनेमा हॉलचे एकूण कलेक्शन १५०x१००x१०० = १५,००,००० रुपये असेल. यावर ३० टक्के करमणूक कर वजा केल्यावर एकूण १०,५०,००० रुपये राहतात. जर करारानुसार ८० टक्के रक्कम वितरकाला मिळावी असे ठरवले असेल, तर त्याला एका आठवड्यात ८,४०,००० रुपये मिळतात. वितरकाला चित्रपट चालेल तसा पुढील आठवड्यांमध्ये त्याचा वाटा मिळत राहतो.
Arbaz Patel Bigg Boss Marathi 5 : महाराजांचा जयजयकार न करणारा अरबाज आहे तरी कोण?
याप्रकारे, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या गणनेची प्रक्रिया ही अत्यंत जटिल असते, जी अनेक घटकांवर अवलंबून असते. ही प्रक्रिया समजून घेतल्यावर चित्रपट उद्योगातील आर्थिक गणितांची सखोल माहिती मिळू शकते.