Shreya Bugade on Nilesh Sabale : श्रेया बुगडे हीच नाव आल की ते डोक्यात सर्वात पहिल्यांदा नाव येत ते ‘ चला हवा येऊ द्या’ या शो च . या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे घराघरात पोहचली. तिचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी श्रेयाला अगदी भरभरून प्रेम केल .
श्रेया बुगडे कडे विलक्षण अस मिमिक्री स्किल असल्यामुळे तिचे मिमिक्री चे स्किट खूप गाजले. विशेषतः सई ताम्हणकर ची तिची मिमिक्री प्रेक्षकांना खूप आवडली. तिने आपल्या विनोदी अभिनयाने मराठी इंडस्ट्री मध्ये आपला वेगळा स्थान निर्माण केल.
“ चला हवा येऊ द्या “ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर श्रेया ने काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं होत.
परंतु चला हवा येऊ द्या मधील दुसरे कलाकार म्हणजेच भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळे यांनी ब्रेक न घेता , दुसरे शो साइन केले. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी एकत्र येऊन कलर्स मराठी वर हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो सुरु केला.
हे पण पाहा :
How to identify Intelligent Children: हुशार मुलं ओळखण्याची 3 खास चिन्हे: तुमचं मूलही आहे का यात?
Sangram Salavi Entry: देवयानी च्या संग्राम ची या मालिकेत जबरदस्त एंट्री!
दुसरीकडे कुशल बद्रिके याने हेमांगी कवी बरोबर हिंदी शो मॅडनेस मचायेंगे हा साइन केला. या शो मध्ये नंतर गौरव मोरे ने देखील एंट्री केली.
परंतु श्रेया बुगडे ने मात्र कोणताच शो साइन केला नाही. आणि तिने काही काळ ब्रेक घेतला. आता ती नव्या जोमाने सुरु करणार आहे.
श्रेया ला जेव्हा निलेश साबळे बरोबर नवीन शो मध्ये काम न करण्याबाबत विचारल असता तेव्हा तिने याबाबत खुलासा केलं आहे आणि त्याचवेळेस आपल्याला हिंदी कार्यक्रमा मध्ये देखील ऑफर होती असा उलगडा तिने केला आहे.
चला हवा येऊ द्या नंतर निलेश साबळे ने भाऊ कदम आणि ओंकार भोजणे सोबत मिळून कलर्स मराठी वर हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो प्रेक्षकांसाठी घेऊन आला. प्रेक्षकांना धक्का त्यावेळेस बसला जेव्हा त्यांना कळाल की या शो मध्ये श्रेया बुगडे दिसणार नाही.
आणि हाच प्रश्न जेंव्हा श्रेया ला एका मुलाखतीत विचारला गेला त्यावेळेस तिने उत्तर दिल की, “कारण मला वाटलं की, मला एका ब्रेक ची गरज आहे. लगेच तशीच भूमिका करण मला जमणार नव्हत. त्यासाठी मी रिफ्रेश झालेली नव्हते. तेव्हा मी विचार केला की, त्या ठिकाणी गेल्यावरही मी काही नवीन करू शकणार आहे का? की पुन्हा तसंच काही करणार आहे. त्यामुळे थोडा काळ थांबून पुन्हा नव्याने नवीन पात्र किंवा काम कारावस वाटल किंवा काहीच नाही तर किमान कोऱ्या पतीने तरी मला काम करायचं होत, त्यामुळे मी तो ब्रेक घेतला. “
श्रेया बुगडे ने या ब्रेक च्या काळात आपला एक हॉटेल मुंबई मध्ये सुरु केलं आहे.
आणखी वाचा :