Kanyadaan Serial : कन्यादान मालिकेतील आणखी एक अभिनेता अडकला विवाह बंधनात!

Kanyadaan Serial: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर या दोघांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत ते एकत्र काम करत होते. आणि या मालिकेदरम्यान त्यांच एकमेकांशी प्रेमाच नात जुळल. कन्यादान मालिकेतील ही रील लाईफ जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा विवाह बंधनात अडकल्याचे पाहून प्रेक्षकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या लग्नाला कन्यादान मालिकेची संपूर्ण टीम हजर राहिली होती. तर रमेश परदेशी, प्रवीण तरडे, हर्षदा खानविलकर यांनाही लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. शुभंकर आणि अमृता या दोघांनी लग्न केले त्यानंतर काही दिवसातच कन्यादान मालिकेच्या अभिनेत्याची लगीनघाई सुरू झाली.

काल गुरुवारी २ मे रोजी अभिनेता चेतन गुरव याने पायल हरमळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. पायल आणि चेतन यांचा हा प्रेमविवाह आहे..काही दिवसांपूर्वीच चेतनने पायलसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत ‘ घरवाले मान गये’ अशा आशयाची पोस्ट लिहिली होती.

Chetan Gurav Wedding Pics

आमच्या लग्नाला घरच्यांनी परवानगी दिली असे चेतनने जाहीर करताच पायल सोबत त्याने साखरपुडा केला होता. त्यानंतर काहीच दिवसात या दोघांनी मोठ्या थाटात लग्नही केले आहे. काल पार पडलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याला संग्राम साळवी, रोहित माने, स्नेहल शिदम, वनिता खरात, उमा सरदेशमुख, प्राची मोरे, प्रज्ञा चावंडे या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सन मराठीवरील कन्यादान मालिकेतून आकाशच्या भूमिकेने चेतनला लोकप्रियता मिळवुन दिली आहे. कॉलेजमध्ये असतानाच चेतनने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. माधुरी मिडल क्लास या स्टार प्रवाहच्या मालिकेतून त्याने एक मजेशीर भूमिका साकारली होती. वैजू नं १ आणि त्यानंतर तो आता सन मराठीच्या कन्यादान मालिकेतून झळकला.

Chetan Gurav Wedding Pics

आकाश आणि अमृताच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं आहे. त्याचमुळे ही मालिका दोन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चेतनने ही भूमिका सुंदर वठवलेली पाहायला मिळाली होती. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी पायल आणि चेतन गुरव यांना मनापासून शुभेच्छा.

आणखी वाचा :

Juna Furniture Box Office Collection : जुनं फर्निचर या चित्रपटाने कमावले तब्बल ईतके पैसे!

Punha Kartvya Aahe : पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत देवीच्या मंदिरात वसू आणि आकाश मध्ये नवीन नातं जुळेल?

Aai Kuthe kay karte : आशुतोष च्या जाण्यामुळे माझी मनस्थिति खूप जास्त.. म्हणून मी..

Leave a Comment