का रे दुरावा मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकरने गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. ती अभिनेता पीयूष रानडे सोबत विवाह बंधनात अडकली आहे. याची माहिती सुरुचिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सुरूची आणि पीयूष यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून, लग्नाचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.
सुरुची आणि पीयूष यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले आहे. दोघांनीही मॅचिंग केल्याच फोटोवरून दिसतंय. सुरुचिने पिवळी बनारसी साडी नेसली असून त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी असणारा ब्लाऊज घातला आहे. तर पियूषने व्हाईट कलरचा कुर्ता घातला असून, पिवळ्या रंगाचा शेला घातला आहे. दोघांनीही साध्या लुक मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुरुचिने फोटोला सुंदर असे कॅप्शन दिले आहे. “आनंदाचा दिवस” असे कॅप्शन लिहीत PSILoveYou अस हॅशटॅग देखील दिला आहे. चाहत्यांनी आणि कलाकारांनी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पीयूष पहिल्यांदा शाल्मली टोल्ये सोबत विवाह बंधनात अडकला होता, मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर तो मयूरी वाघ सोबत विवाह बंधनात अडकला होता. त्यांचाही लवकरच घटस्फोट झाला. आता तो सुरूची सोबत लग्नाच्या बंधनात अडकला आहे. त्यांनी गुपचुप लग्न उरकले आहे.
तुम्हाला पीयूष रानडे आणि सुरूची अडारकर यांची जोडी आवडली का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.