ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेची दमदार एंट्री! अप्पू वाचवणार नेत्राला मोठ्या संकटातून……………….

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह वरील चांगलीच मनोरंजन करत आली आहे. ही मालिका एकत्रित कुटुंबावर अवलंबून आहे, अशी दाखवण्यात आली आहे. सध्या आपण मालिकेत पाहत आहोत की अपूर्वा गरोदर आहे. नेत्रा आणखी एकदा शशांक आणि अप्पूच्या आयुष्यात आली आहे. शशांकची बॉस बनून नेत्रा आली आहे, ही गोष्ट तो अप्पू पासून लपवतो. पण अप्पूला ही गोष्ट माहीती झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेची एंट्री होणार आहे. मालिकेच्या पुढील भागात आपल्याला अक्षय वाघमारे दिसणार आहे. आपण पाहिले की नेत्रा परत आलेली असून, तिचे लग्न झाले आहे. तिचा नवरा तिला खुप मारहाण करतो, असे तिच्या चेहऱ्याच्या खुणांवरून दिसून येत आहे. ती त्या खुणा लपवण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

आतापर्यंत तिच्या नवऱ्याला दाखवण्यात आले नव्हते, परंतु पुढच्या भागात तिच्या नवऱ्याला दाखवण्यात आले आहे. तिचा नवरा अभिनेता अक्षय वाघमारेला दाखवण्यात आले आहे. मालिकेत त्याचे नाव निनाद असे आहे. छळ करणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारताना तो आपल्याला दिसणार आहे. अपूर्वा जेव्हा नेत्राच्या घरी जाते तेव्हा तिला तेथील भयानक दृष्य पाहून धक्काच बसतो. नेत्राचा नवरा तिच्यावर अत्याचार करत असून, नेत्राच्या ऑफिसचा लॅपटॉप ज्यामध्ये प्रेझेंटेशन आहे तो लॅपटॉप देखील आदळतो. हे सर्व अपूर्वाने स्वतः पाहिले आहे.

अपूर्वा आणि कानिटकर कुटुंब नेत्राला मदत करेल का? अपूर्वा नेत्राला कशा प्रकारे पाठिंबा देईल हे मालिकेच्या पुढील भागातच कळेल. पुढचा भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी मालिका आवडते का? आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment