एकदा येऊन तर बघा चित्रपटामध्ये शार्प शूटर विशाखा सुभेदार!

अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या ‘डॅशिंग रावडी लूक’ मध्ये दिसणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात. येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

विशाखा सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

Leave a Comment