या कलाकारांची अर्ध्या मालिकेतूनच हकालपट्टी

काही  मालिकांमद्धे कलाकारांची रातोरात बदली होते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. काही कलाकार स्वतःहून वायक्तिक कारणांसाठी मालिका सोडतात तर काहींना काढून टाकल जातं. मराठीतील लोकप्रिय मालिकांमधून कोणकोणत्या कलाकारांनी मध्येच काढता पाय घेतला ते पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्राजक्ता गायकवाड: आता नुकताच ‘आई माझी काळुबाई’ ह्या मालिकेचा वाद संपला. मालिकेतील सहकालाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका सोडली.

इशा केसकर: अभिनेत्री इशा केसकर हिने सुद्धा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका मध्येच सोडली होती. ह्यावेळी इशाने तिच्या दाढेच ऑपरेशन असल्याच कारण देत ही मालिका सोडली होती.

किरण ढाणे: अभिनेत्री किरण ढाणे ही ‘ लगिर झालं जी’ ह्या लोकप्रिय मालिकेत जयडीची भूमिका साकारत होती. हिने मालिका सोडण्याच कारण असं की तिने निर्मात्यांकडे मानधन वाढण्याची मागणी केली परंतु निर्मात्यांना ती अमान्य होती.

विद्या सावळे: अभिनेत्री विद्या सावळे ह्या ‘लगिर झालं जी’ ह्या मालिकेत मामीची भूमिका साकारत होत्या. यांनी सुद्धा मानधनाच्या कारणामुळे ही मालिका सोडली होती.

उर्मिला निंबाळकर: स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी’ ह्या मालिकेत मैथिलीची प्रमुख भूमिका साकारणारी उर्मिला हिने मालिका का सोडली होती ही अद्याप स्पष्ट झालेल नाही. तिच्या जागी सुपर्णा शाम या अभिनेत्रीला प्रमुख भूमिकेसाठी घेण्यात आलं होत.

संजय मोने: ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच शीर्षकगीताचं शूटिंग संजय मोनेंनसोबत केलं होत. मात्र जेव्हा मालिका प्रसारित झाली तेव्हा त्यांच्या जागी गौतम जोगळेकर पाहायला मिळाले. या अचानक बदलाचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

शिवानी सुर्वे: ‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी शिवानी सुर्वे हिने मालिका मध्यातच सोडली. शूटिंग शेड्युलवरुन निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर शिवानीने ही मालिका सोडली होती.

दीपाली पानसरे: ‘आई कुठे के करते’ ह्या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी दीपालीने करोनामुळे ही मालिका मध्येच सोडली. तसेच तिच्या लहान मुलांच कारण देत तिने ही मालिका सोडली यसे तिने सांगितले

रवी पटवर्धन: ‘अंग्गबाई सासूबाई’ ह्या मालिकेत आजोबांची भूमिका साकारणारे रवी पटवर्धन करोना मुळे मालिकेपासून दूर झाले असे सांगितले. परंतु अद्यापही त्यांनी मालिकेत एंट्री केली नाही.

वंदना गुप्ते: ‘सुखाच्या सरीने ही मान बावरे’ या मालिकेतील दुर्गा मॅडम म्हणून आधी वंदना गुप्ते ह्या होत्या. मात्र नंतर त्यांची जागा अभिनेत्री आशा शेलार यांनी घेतली होती.

Tags: Marathi Actors left serials

Leave a Comment