छोट्या पडद्यावरील मालिका सर्वसामान्य प्रेक्षकांच्या घरातील विषय घेऊन प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. यात काही मलिकांना यश मिळतं तर काही मालिका अपयशी ठरतात. असंच काहीसं झालंय ते कस्तुरी या मालिकेविषयी. कस्तुरी ही मालिका २६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सुरुवातीला प्रेक्षकांकडून मालिकेला खास असा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु समर आणि कस्तुरी यांचे लग्न झाल्यापासून या मालिकेत प्रेक्षकांना देखील रस आला होता.
परंतु या मालिकेचा १३ ऑक्टोबर रोजी शेवटचा भाग प्रदर्शित होऊन मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यामुळे कस्तुरी मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत. आत्ता कुठे मालिका पाहायला प्रेक्षकांना इंटरेस्ट येत होता. अजून खूप स्टोरी पहायची होती. मालिका बंद झाल्यामुळे मालिकेचे चाहते पुन्हा मालिका सुरु करायला सांगत आहेत. परंतु कस्तुरी मालिका बंद का झाली हे आपण जाणून घेऊयात!
कलर्स मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना आवडतील अश्या मालिका घेऊन येत असते. काही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतात, परिणामी त्याचा टीआरपी देखील खूप वाढतो. परंतु काही मालिका प्रेक्षकांना आवडत नाहीत, त्यामुळे मालिकेला टीआरपी देखील कमी येतो. सुरुवातीला कस्तुरी मालिकेला प्रेक्षकांनी कमी पसंती दाखवली होती. नंतर समर आणि कस्तुरीचे लग्न झाले. तेव्हा या मालिकेचे थोडे प्रेक्षकही वाढले. परंतु या मालिकेला पाहिजे तसा टीआरपी न मिळाल्यामुळे मलिका बंद झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या मालिकेचे एकूण १०२ एपिसोड्स प्रदर्शित झाले. शेवटच्या भागात आपण पाहतो की समरला आपल्या चुकांची जाणीव होते. आपण आपल्या फायद्यासाठी गोर गरीबांचा आणि कस्तुरीचा वापर करुन घेतला याचा समरला पश्चाताप होतो. कस्तुरी देखील आपल्या घरी जाणार असते त्यामुळे समर अस्वस्थ होतो. परंतु समरचे आईबाबा कस्तुरीचे आपण नव्याने गृहप्रवेश करुयात म्हणतात. तेव्हा घरातील सर्वजण कस्तुरीचा माप ओलांडून नव्याने गृहप्रवेश करुन घेतात आणि कस्तुरीला त्रास देणारे सर्वजण आपल्या चुका मान्य करतात.
तर मित्रांनो कस्तुरी मालिका एवढ्या लवकर अचानक बंद झाली यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा!