अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आहेत नणंद भावजय

मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या १७ व्या वर्षी संदेश कुलकर्णीच्या प्रेमात पडली . संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी अमृता सोनालीला शुभेच्छा देण्यासाठी घरी गेली आणि संदेशच्या प्रेमात पडली. पुढे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी लग्न केले. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना देखील खुप आवडते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अमृताचा पती लेखक , अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने बऱ्याचवेळा एकत्र काम केले आहे. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योति सुभाष यांची मुलगी आहे. तीची अनेक नाटके खुप गाजलेली आहेत. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. तसेच ती उत्तम लेखिकाही आहे तिचे २०१४ मध्ये ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

 तुम्हांला अमृता आणि संदेशची जोडी कशी वाटते ? तुम्हांला अमृता सुभाष ही अभिनेत्री आवडते का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.  

Leave a Comment