स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ची होणार एन्ट्री

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत सध्या जरा वेगळ वळण आलेल आहे. माऊने चक्क तिचे वडील म्हणजेच विलास पाटलांसामोर सिद्धांत सोबत लग्नाला नकार देऊन मी लग्न करेल तर शौनक सोबत नाहीतर लग्नच करणार नाही अशी कबुली दिलीय. माऊचे हे बोलणे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय. पण सिद्धांतला मात्र माऊसोबतच लग्न करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर मालिकेत नविन एन्ट्री होणाऱ्या पात्राच नाव आहे नीलिमा सावंत . ही भूमिका अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत साकारणार आहे. यात शर्मिष्ठा नीलिमच्या नकारात्मक भुमिकेत असल्याच कळत आहे. सिद्धांत नीलिमाच्या मदतीने विलास पाटलांची बदनामी करून माऊला लग्नासाठी तयार करणार असल्याच कळत आहे.

तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment