अभिनेता करण बेंद्रे विवाह बंधनात अडकला

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता करण बेंद्रे याचा २५ ओक्टोंबरला त्याची कॉलेजपासूनची खास मैत्रीण निकिता नारकर सोबत साखरपुडा पार पडला होता आणि ३० नोव्हेंबर रोजी त्यांच लग्न देखील पार पडलं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

करण म्हणाला आम्ही गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय घेत होतो आणि हयात आमचे कुटुंब देखील आमच्या सोबत होते. तो म्हणतो कॉलेजची मैत्री सुंदर होतीच पण, आता पती-पत्नी असणे ही पूर्णपणे खास भावना आहे. आम्ही आमच्या जीवनाचा खास टप्पा सुरू करण्यास उत्सुक आहोत.

कोविडमुळे लग्न करणाऱ्या ठिकाणी सुरक्षित अंतराची तत्वे पाळून, सर्व नियम पाहून विवाह पार पडला. करण म्हणाला की कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी विडिओ कॉलद्वारे सर्व विधी पाहून आंम्हाला आशिर्वाद दिले.

करण बेंद्रे ला आपण ‘प्रेम पॉइसन पंगा’ नावाच्या मराठी कार्यक्रमात पाहिलं होत. तसेच अनन्या ह्या नाटकमद्धे देखील त्याने कामं केल होतं. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही वाढला आहे. तर निकिता ही कुलाब्यात भारतीय नौदलाच्या एच आर विभागात काम करते.    

Tags: Karan Bendre Wedding, Karan Bendre Marriage, Karan Bendre Lagn, Karan Bendre Wife

Leave a Comment