जेनेलियाला रीतेशसोबत लग्न न करण्याचा दिला होता काहीजणांनी सल्ला

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाने एकत्र २००२ साली तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलीवूडमद्धे पदार्पण केले होते. या दोघांनी तुझे मेरी कसम चित्रपटाशिवाय मस्ती, तेरे नाल लव हो गया चित्रपटात देखील काम केले आहे. २०१२ साली जेनेलीया आणि रितेश विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत रहील आणि रियान.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लग्नावेळी लोकांनी तिला असं करण्यास मनाई केली होती. ती म्हणाली की, लोक तीला सांगत होती की, लग्नानंतर तुझं करियर संपेल. पण त्यावेळी जेनेलियाने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता रितेशसोबत लग्न केले. लग्नानंतर जेनेलिया घरात आणि मुलांमद्धे बिझी झाली.

लग्नानंतर ती काही सिनेमांमध्ये दिसली देखील. जॉन अब्राहमसोबत तिने एका सिनेमात काम केलं होतं. त्यांनंतर ती रितेशच्या मराठी सिनेमात पाहुणी कलाकार म्हणूनही दिसली होती. आता ती एक निर्माती झाली आहे आणि दोघेही लवकरच एका प्रोजेक्टमद्धे एकत्र दिसणार आहेत.

जेनेलियाची चाहते देखील तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tags: genelia and riteish deshmukh marriage

Leave a Comment